शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ शहरातील शतकोत्तर सार्वजनिक वाचनालयात 50 हजारांवर ग्रंथ संपदा

By admin | Updated: April 23, 2017 17:32 IST

ब्रिटिशकालीन वाचनालयाची दीड शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू आह़े

ऑनलाइन लोकमत / गणेश वाघ  (पुस्तक दिन विशेष) भुसावळ, जि. जळगाव, दि. 23 - भुसावळातील सार्वजनिक वाचनालयाला सुमारे 147 वर्षाचा इतिहास असून ब्रिटिशकालीन वाचनालयाची दीड शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू आह़े आजघडीला सुमारे 50 हजार ग्रंथ संपदा वाचनालयात आह़े भुसावळ तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय एकमेव अ वर्ग प्राप्त हे वाचनालय असून  या वाचनालयाच्या अंतर्गत 20 वाचनालये (पालकत्वाखाली) तालुक्यात आहेत़ब्रिटिशकालीन वाचनालय20 जुलै 1870 मध्ये या वाचनालयाची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे.  ब्रिटिशकालीन वाचनालय असून सुरुवातीला त्याचे नाव नेटिव्ह पब्लिक लायब्ररी असल्याचा उल्लेख असून स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक वाचनालय असे नामकरण करण्यात आल़े विद्याथ्र्यासाठी विविध उपक्रमवाचनालयातर्फे विद्याथ्र्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात़  त्यात बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात तर थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीदिनी तसेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे आयोजन केले जात़े शिवाय छायाचित्र व ग्रंथ प्रदर्शनही भरवले जात़े स्पर्धा परीक्षेसाठी विविध पुस्तके स्पर्धा परीक्षेसाठी प्रतियोगिता दर्पण, कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू व स्पर्धा परीक्षा ही पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहेत़ विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत ती उपलब्ध आहेत़ विद्याथ्र्याना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आह़े सुसज्ज वाचनालयाची आवश्यकतावाचनालयाला शासनाकडून साधारणत: दोन टप्प्यात प्रत्येकी एक लाख 92 हजार रुपये अनुदान दिले जात़े एकूण तीन लाख 84 हजार मिळणा:या अनुदानाच्या तुलनेत कर्मचारी पगार व अन्य बाबींवर होणारा खर्च अधिक असल्याने शासनाने वाचनालयाच्या अनुदानात वाढ करण्याची गरज आहे.  नेटीव्ह पब्लिक लायब्ररी ते सार्वजनिक वाचनालय़़़ब्रिटीशांनी 1870 मध्ये या वाचनालयाची स्थापना केल्याचा संदर्भ आढळतो़ सुरुवातीला या वाचनालयाचे नाव नेटीव्ह पब्लिक लायब्ररी असल्याचे संशोधन अॅड़स्व़मो़वा़केळकर व स्व़डॉ़बी़व्ही़कानीटकर यांना 20 जुलै 1890 मध्ये मिळालेल्या अहवालावरून केले होत़े धर्मशाळेतून वाचनालय आले जुन्या न्यायालयात1884 मध्ये हे वाचनालय मूलचंद धर्मशाळेत होते मात्र नंतर त्याचे यावल रोडवरील शासकीय जागेवर स्थलांतर झाल़े वाचनालय आज ज्या जागेवर उभे आहे तेथे ब्रिटीशकालीन न्यायालय होते व मागच्या बाजूला कैद्यांना फाशीची शिक्षा दिली जायची, असा संदर्भही आढळतो नंतर या न्यायालयाच्या जागेवर वाचनालयाची उभारणी करण्यात आली़ आजही ब्रिटीशकालीन इमारत त्याची साक्ष देत़े हल्ली वाचनालयाची जागा पालिकेच्या नावावर आह़े