शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यात ५ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या ५ जागा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:27 IST

४ पोटनिवडणुका आणि १ पंचवार्षिक निवडणूक

भडगाव : तालुक्यात घुसर्डी खुर्द, पिचर्डे, अंतुर्ली, वलवाडी या ४ गावांच्या ग्रा. पं. सदस्य पदाच्या ४ पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या. तर बोरनार ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ७ जागांसाठी होती मात्र लोकनियुक्त सरपंच पदासह ६ सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाहीत. मात्र प्रभाग ३ मध्ये एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही जागा बिनविरोध निवङुन आली. अशा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीच्या एकुण ५ सदस्य पदाच्या जागा बिनविरोध आल्या आहेत.माघारीला १० रोजी अंतीम दिवशी चित्र स्पष्ट झालेहोते. तसेच तालुक्यातील वडगाव बु, भट्टगाव, गोंडगाव, भातखंडे या ४ ग्रामपंचायतीच्या ४ सदस्य पदाच्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ४ ही जागा आरक्षीत असल्याने जात प्रमाणपत्र नसल्याने रिक्त असल्याची माहीती भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर यांनी दिली.बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. घुसर्डी येथे प्रभाग १ मध्ये पुनम जितेंद्र परदेशी, पिचर्डे येथे प्रभाग२ मध्ये रत्नाबाई भिमराव मोर, वलवाडी येथे प्रभाग १ मध्ये वानुबाई भिला मोरे, अंतुर्ली येथे प्रभाग ३ मध्ये ऊषाबाई जयवंतराव पाटील हे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. तसेच बोरनार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये सदस्य पदासाठी गोपाळ रामदास माळी हे बिनविरोध निवङुन आले. आता बोरनारचे लोकनियुक्त सरपंच पद व ६ सदस्य पदासाठींच्या जागा रिक्त आहेत. नंतर या रिक्त जागांसाठी पुढे पुन्हा निवङणुकीचा कार्यक्रम लागु शकतो.

टॅग्स :Electionनिवडणूक