शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

47 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: January 15, 2017 01:01 IST

भालोदला तणावपूर्ण शांतता : फलक हटवले, परस्परविरोधी गुन्हे

यावल/भालोद : फलक फाडल्याच्या कारणावरून भालोदला उफाळलेल्या  वादप्रकरणी दोन्ही गटांतील 47 जणांविरुद्ध परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आल़े संशयित आरोपींमध्ये बाजार समितीचे सभापती नारायण चौधरी यांचाही समावेश आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीने गावातील सर्वच फलक हटवले आहेत़ पोलिसांचा तगडा बंदोबस्त गावात कायम असून तणावपूर्ण शांतता आह़ेदरम्यान, फलक काढण्याबाबत ज्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता त्यांनीच हे काम केल्याचा आरोप एका गटातर्फे भारत भालेराव यांनी फिर्यादीत केला आह़े त्यावरून 27  आरोपींविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 295 तसेच अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती प्रती सुधारणाचे कलम 3 (1) (4), 3 (1), (6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कृउबा सभापती नारायण शशिकांत चौधरी यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये पाडळसा-भालोद गण आरक्षित झाल्याने पित्त खवळण्याचा तसेच  जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आह़े संशयित आरोपींमध्ये नारायण चौधरी, प्रकाश जावळे, जीवन इंगळे, विजय चौधरी, नरेंद्र परतले यांचा मुलगा, भूषण चौधरी, चिराग जावळे, वैभव वारके, भरत जावळे, योगेश चौधरी, अक्षय परतणे, चंद्रशेखर झांबरे, सतीश खंबाईत, भरत चौधरी, नीलेश परतणे, चंदन चौधरी, युवराज चौधरी, चिराग जावळे, तुषार झांबरे, सूरज चौधरी, चेतन चौधरी, पंकज चौधरी, हेमंत झांबरे, दिव्यांग सोनवणे, देवेंद्र  इंगळे, संदीप राणे, ललित चौधरी व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला़दुस:या गटाचीही तक्रारदुसरी फिर्याद विजय इंगळे यांनी दिली़ शनिवारी सकाळी सात ते 7.30 वाजेच्या दरम्यान गावातील 20 ते 25 तरुणांनी दुकाने बंद करा, असे सांगत गावातील मुरलीधर जावळे यांचे श्रीजी रेस्टारंट, भालोद दूध उत्पादक सोसायटी, सर्वज्ञ कृषीकेंद्र, मनुदेवी पान सेंटर या दुकानांची तोडफोड करण्यात आली़जमावाने दहशत निर्माण करण्यासाठी कु:हाडी, पाईपने मारू, अशी धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आह़े चिखली दरवाजा, बसस्टॅण्ड व न्यू इंग्लिश स्कूलजवळ दगडे आडवे लावत तसेच मोटारीचे टायर जाळून दहशत निर्माण केल्याचा आरोप आह़े  त्यावरून 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ संशयित आरोपींमध्ये राहुल भालेराव, गौरव  भालेराव, सागर भालेराव, वैभव  भालेराव, विपूल भालेराव, कुणाल भालेराव, भारत भालेराव, किशोर ड्रायव्हर, हर्षल भालेराव, सागर भालेराव, शुभम चौधरी, भीमराव भालेराव, मुकेश मनुरे, बंटी भालेराव, शरद भालेराव, सतीश भालेराव, अभय भालेराव, कैलास भालेराव, विद्याधर भालेराव, अशोक भालेराव यांच्यासह 20 ते 25 अनोळखींविरुद्ध भादंवि 143, 147, 427, 341 प्रमाणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)