शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

450 वीज कनेक्शन बंदची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 00:26 IST

कारवाईचा बडगा : भडगाव तालुक्यात विविध ग्राहकांकडे 7 कोटींवर थकबाकी

भडगाव : तालुक्यात  वीज वितरण कंपनीची  घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच पाणीपुरवठा योजनांची सर्व मिळून एकूण 7 कोटी 51 लाखाची थकबाकी आहे. आतार्पयत 1 कोटी 70 लाखांच्या जवळपास थकीत वीज बिलाची वसुली करण्यात आली आहे. तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या उपविभागात वीज बिल थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे. थकबाकीदारांनी त्वरित वीज बिले भरावीत असे आवाहन वीज कंपनीचे उपअभियंता आर.बी.शुक्ला यांनी केले आहे.तालुक्यातील वीज बिलांची एकूण 3 कोटी 33 लाखांची थकबाकी होती. पैकी आतापावेतो 1 कोटीच्या जवळपास थकीत वसुली करण्यात आली आहे. अद्याप 2 कोटी 37 लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे.तालुक्यात गावांना पाणीपुरवठा करणारे 110 ग्राहक आहे. त्यांच्याकडे आतार्पयत 4 कोटी 18 लाख रु.ची थकबाकी आहे. आजर्पयत पाणीपुरवठा योजनेची 6 लाखाच्या आसपास वीज बिल वसुली झाली आहे. शासनाच्या प्रोत्साहन योजनेत मुद्दलच्या 20 टक्के व चालू बिल भरुन या योजनेचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो अशी वीज वितरणच्या सूत्रांनी माहिती दिली. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक  असे एकूण 450  वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. नुकतेच जळगाव  वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता जनवीर, पाचोरा कार्यकारी अभियंता गरुड आदींनी वीज बिल वसुली मोहीमबाबत बैठक घेवून मार्गदर्शन केले. तालुक्यात वीज कंपनीचे अधिका:यांसह कर्मचा:यांच्या प्रयत्नातून थकीत वीज बिलांची वसुली मोहीम सुरू आहे तरी थकबाकीदारांनी त्वरित वीज बिलाची रक्कम भरावी व वीज मंडळास सहकार्य करावे असे आवाहन भडगाव वीज कंपनीचे उपअभियंता शुक्ला यांनी केले आहे.  तालुक्यात थकबाकीदार वीज बिलांची मोहीम राबवली जात आहे. आतापावेतो 1 कोटी 6 लाखाच्या जवळपास वसुली  झाली आहे तर 450 थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. ही वसुली मोहीम सुरुच राहणार असून ग्राहकांनी कारवाईची कटू वेळ आणू नये.- आर.बी.शुक्ला, उपअभियंता वीज वितरण कंपनी भडगाव