शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुक्ताईनगर येथे तीन दिवसात वाढले ४० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:40 IST

तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत चार दिवस जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देप्रशासन खडबडून जागेतातडीच्या बैठकीत घेतला चार दिवस जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शुक्रवार ते रविवार या केवळ तीन दिवसातच मुक्ताईनगर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊन केवळ तीन दिवसात ४० रुग्ण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत चार दिवस जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढीव रुग्णांच्या दृष्टिकोनातून नवीन कोविड सेंटरची तत्काळ उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.२१ मार्चपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन असले तरी मुक्ताईनगर शहरात पहिला रुग्ण हा १ जून रोजी आढळला होता. त्यानंतर १५ दिवस रुग्णांची संख्या मर्यादितच होती, मात्र गेल्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवार ते रविवार या तीन दिवसातच ४० नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील सीडफार्म तसेच इतर हॉटस्पॉटच्या ठिकाणी कॉरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. सोमवारी सायंकाळी तहसीलदारांच्या दालनात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार श्याम वाडकर, नगराध्यक्ष नजमा तडवी, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष बंटी जैन, नगरसेवक संतोष मराठे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, शुभम शर्मा, तानाजी पाटील उपस्थित होते.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील कोणत्या ठिकाणी नवीन कोविड सेंटर उभारण्यात यावे याची चर्चा झाली. शासकीय आयटीआय उचंदा, कृषी महाविद्यालयाची नवीन इमारत तसेच खडसे महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह या तीन ठिकाणच्या वास्तूंचा विचार करण्यात आला.दरम्यान, तहसीलदार स्वत: शासकीय आयटीआय उचंदा येथील वास्तूची पाहणी करणार असून, त्यानंतर कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. नवीन वाढीवर रुग्णांच्या दृष्टिकोनातून जवळपास २०० खाटा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील हे स्वत: १०० खाटा उपलब्ध स्वखर्चातूून करून देणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. प्रशासनामार्फत अधिक १०० खाटा उपलब्ध करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. नगरपंचायतीनेही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. तसेच आशावर्कर व आशासेविका यांनी शहरात फिरून केलेल्या तपासणीचे मानधन नगरपंचायतीने लवकर द्यावे, अशी सूचनादेखील तहसीलदार वाडकर यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना केली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक बैठकीत करण्यात आले.जनता कर्फ्यूमध्ये चार दिवसांची वाढशुक्रवारी मुक्ताईनगर शहरात प्रथमच १० रुग्णांची वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गेल्या बैठकीत ५ ते ७ जुलै असे तीन दिवस जनता कर्फ्यू करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र केवळ तीन दिवसातच ४० रुग्णांची भर पडली. आज झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत जनता कर्फ्यूत पुन्हा चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता जनता कर्फ्यू शनिवारपर्यंत म्हणजेच १० जुलैपर्यंत राहील. रविवारपासून व्यवहार सुरळीत करण्यात येईल.जनता कर्फ्यूत नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रविवारपासून सुरू होणाºया बाजारपेठेत बाहेरील व्यापाºयांनी सहभाग घेऊ नये अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. यासाठी व्यापाºयांनी सहकार्य करण्याचे आवाहन व्यापारी आघाडीचे अध्यक्ष बंटी जैन यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर