शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रेल्वेच्या उत्पन्नात ४० टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 22:11 IST

आंतरराज्य वाहतुकीचा लाभ : २० दिवसात प्रवाशांच्या माध्यमातून ३१ लाखांची कमाई

भुसावळ : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती व नंतर काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र अनलॉक प्रक्रियेत २ सप्टेंबर पासून आंतरराज्य रेल्वे प्रवासाला मुभा दिल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २० दिवसात भुसावळ रेल्वे स्थानका वरून तब्बल ११ हजार प्रवाशांनी ३१ लाखांचे तिकीट बुकिंग केले आहे.भुसावळ स्थानकावरूनधावतात ५० गाड्याकोरोना काळात अनलॉक नंतर हळूहळू प्रवासी गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येत आहे. यातच रेल्वे प्रशासनातर्फे क्लोन ट्रेन सुद्धा नवीन सुरू करण्यात येत आहे. याशिवाय काही साप्ताहिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. यामुळे भुसावळ विभागातून सुमारे अप -डाऊन मध्ये ५० रेल्वे धावत आहे.अनेकांनी केली बुकींगभुसावळ रेल्वेस्थानका वरून आंतरराज्य तसेच इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी १ ते १० सप्टेंबर या कालखंडात ५ हजार प्रवाशांनी तिकीट बुकिंग केली व यातून रेल्वे प्रशासनाला १४ लाख ८६ हजारांचे उत्पन्न मिळाले तर ११ ते २० सप्टेंबर या कालखंडामध्ये रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली व नंतरच्या दहा दिवसात पाच हजार ७०० प्रवाशांनी १५ लाख ९५ हजार रुपयांचे तिकीट बुक करून रेल्वे प्रवास सुनिश्चित केला. एकंदरीत २ सप्टेंबर पासून आंतरराज्य प्रवासासाठी मुभा मिळाल्यानंतर रेल्वेच्या उत्पन्नात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झालेली आहेफक्त आरक्षण तिकीटअसल्यास प्रवासाची मुभाकोरोनाकाळामध्ये खऱ्या अर्थाने रेल्वेने सुसहय प्रवास होत आहे. पूर्वी सामान्य, सलीपर क्लास व एसी क्लास मधून वेटिंग तिकीट जरी असले तरी दरवाजा पर्यंत भरगच्च गर्दीसह प्रवास करावा लागत होता. मात्र कोरोना काळामध्ये रेल्वे प्रशासनाने प्रवासासाठी निर्बंध घातले असून प्रवासाकरीता फक्त कन्फर्म तिकीट असेल त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात आहे.दरम्यान आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वेचे उत्पन्नही आणखी पुढे निश्चितच वाढणार आहे.