शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नवप्रकाशमधून चार कोटींची थकबाकी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:02 IST

महावितरण कंपनीची योजना : औद्योगिक, घरगुती ग्राहकांचा प्रतिसाद; जुलैपर्यंत तीन महिने मुदतवाढ

जळगाव : महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळात नवप्रकाश योजनेत चार कोटी १६ रूपयांची थकबाकी जमा झाली आहे़ घरगुती तसेच औद्योगिक ग्राहकांचा या योजनेला प्रतिसाद मिळत असून कृषीपंपधारक शेतकºयांनी याकडे सपशेल पाठ फिरविल्याचे चित्र आहे़ एप्रिलपर्यंत मुदत असलेल्या या योजनेला आता जुलै २०१७ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे़ त्यामुळे थकबाकी वसुलीची आकडेवारी वाढेल, अशी अपेक्षा महावितरण कंपनीकडून व्यक्त होत आहे़महावितरणच्यावतीने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना नवप्रकाश योजनेच्या माध्यमातून तो पुन्हा जोडण्याची संधी  उपलब्ध करून दिली आहे. प्रारंभी अभय योजना या नावाने सुरू झालेल्या या योजनेचे नामकरण नंतर नवप्रकाश योजना असे करण्यात आले. घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक या प्रकारातील एकूण ३ लाख ४२ हजार २९४ ग्राहकांकडे ११५ कोटी ९७ लाख वीज बिलाची थकबाकी आहे. यापैकी ७ हजार ३६ ग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभाग नोंदविला़ त्यातून महावितरण कंपनीकडे  ४ कोटी १६ लाख ५५ हजार रुपये थकबाकी जमा झाली आहे.  आता जुलैपर्यंत योजनेला मुदतवाढ१ नोव्हेंबर २०१६ ते ३० एप्रिल २०१७ दरम्यान नवप्रकाश योजनेची मुदत होती. मात्र २७ सायंकाळी महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून योजनेला मे ते जुलै २०१७ पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे परिपत्रक जारी झाले़ त्यानुसार आता एप्रिलपर्यंत थकबाकीचा भरणा करणाºया ग्राहकाला १०० व्याज व दंड माफीचा लाभ मिळणार आहे़ तर एप्रिलनंतर जुलै २०१७ पर्यंत ७५ टक्के व्याज माफ व १०० टक्के दंड माफ होणार आहे़ या योजनेत कृषीपंपधारक तसेच  न्यायप्रविष्ट प्रकरणातील थकबाकीदारांचाही समावेश करण्यात आला. सार्वजनिक नळ योजना वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. दोन ग्राहकांनी भरले १ कोटी १९ लाख जळगाव परिमंडळातील दोन औद्योगिक ग्राहकांनी नवप्रकाश योजनेत सहभाग नोंदवित़ १ कोटी १९ लाख ५८ हजारांचा थकबाकी भरणा केला़ यात पाचोरा येथील मानसिंगका इंडस्ट्रीजने ५७ लाख ५३ हजार ५९० रुपयांचा भरणा केला़ त्यांना  मुळ थकबाकीत १० लाख १५ हजार ५१७ रुपये इतक्या रक्कमेचा फायदा झाला. तसेच नंदुरबार मंडळातील सातपुडा-तापी परिसर सहकारी साखर कारखाना या ग्राहकाने ६२ लाख ५ हजार १२४ रुपये भरले.कोणताही अर्ज करण्याची गरज नाही  या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. ग्राहकांनी सुविधा केंद्रात, मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १८००-२००-३४३५ व १८००-२३३-३४३५ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. थकबाकीची देयक भरणा पावतीच नाहरकत प्रमाणपत्र समजण्यात येईल. जोडणीकरिता सुरक्षा ठेव, जोडणी सेवा दर, पुनर्जोडणी दर यातून सूट मिळेल. सुरक्षा ठेव पुढील आर्थिक वर्षात वीजवापरानुसार आकारण्यात येईल. ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़