जळगाव: जिल्हा बँकेकडून दरवर्षी खरीप हंगामासाठी सरासरी हजार कोटींच्या आसपास कर्ज वाटप केले जात असताना यंदा मात्र जूनचा आठवडा उलटला तरीही ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाख ६४ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावरही जमा झाली असल्याचा दावा जिल्हा बँकेच्या सूत्रांनी केला आहे.दरम्यान, राष्टÑीयकृत बँकांनी मात्र मुख्यमंत्री व जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही धाब्यावर बसविले असून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविली आहे. ४ जून पर्यंत जेमतेम ३ टक्केच कर्जवाटप केले असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना मात्र नाईलाजाने सावकाराची पायरी चढायची वेळ आली आहे.खरीप हंगाम सुरू होऊनही विविधकार्यकारीसोसायट्यांकडून कर्जमंजुरी तक्तेच जिल्हा बँकेकडे वेळेत सादर झालेले नसल्याने पीककर्ज वाटपास विलंब होत असल्याची तक्रार होत आहे. त्यातच जिल्हा बँकेने कर्जमाफी झालेल्या शेतकºयांना ५० टक्केच पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ते कर्जही मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. याबाबत शेतकरी आंदोलन कृती समितीतर्फे मंगळवार, ५ जून रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन तक्रारही करण्यात आली होती. पेरणीचे दिवस असल्याने बियाणे, खते, पेरणीसाठी शेतकºयांना पैशांची तातडीने गरज आहे. असे असताना जिल्हा बँक व राष्टÑीयकृत बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याची तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने ‘लोकमत’ने जिल्हा बँकेकडून माहिती घेतली असता ४२ हजार २११ शेतकºयांना ३५५ कोटी ९१ लाखांचे कर्ज वाटप झाले असून ते त्यांच्या खात्यातही जमा झाले असल्याचे सांगण्यात आले.सर्व विकासोंचे तक्ते मंजूरजिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील सर्व ८७७ विविध कार्यकारी सोसायट्यांचे कर्ज तक्ते मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही बँकेच्या सूत्रांनी दिली.राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटपराष्टÑीयकृत बँकांनी मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही खरीप हंगामासाठी १० हजाराचे तातडीचे कर्ज वाटप केले नव्हते. यंदाही राष्टÑीयकृतबँकांकडून पीककर्ज वाटपाकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे. जिल्हाधिकाºयांकडे दर आठवड्याला याबाबत आढावा बैठक घेतली जात आहे. ४ जून रोजी झालेल्या बैठकीत राष्टÑीयकृत बँकांनी जिल्'ात जेमतेम ३ टक्के पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांच्या व त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या इशाºयानंतरही राष्टÑीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.
४२ हजार शेतकऱ्यांना ३५६ कोटींचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:03 IST
रक्कम खात्यावर जमा झाल्याचा जिल्हा बँकेचा दावा
४२ हजार शेतकऱ्यांना ३५६ कोटींचे पीककर्ज वाटप
ठळक मुद्दे राष्टÑीयकृत बँकांकडून मात्र आदेश धाब्यावर सर्व विकासोंचे तक्ते मंजूर राष्टÑीयकृत बँकांकडून फक्त ३ टक्के पीककर्ज वाटप