शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

35 दुकानांचे हटवले अतिक्रमण

By admin | Updated: January 9, 2017 00:14 IST

मुक्ताईनगर : शहरातील छत्रपती उद्यानालगत भाजी विक्रेत्यांसह ब:हाणपूर रोडवरील जुने तलाठी कार्यालयालगतचे अतिक्रमण रविवारी ग्रामपंचायतीच्यावतीने हटवत

मुक्ताईनगर : शहरातील छत्रपती उद्यानालगत भाजी विक्रेत्यांसह ब:हाणपूर रोडवरील जुने तलाठी कार्यालयालगतचे अतिक्रमण रविवारी ग्रामपंचायतीच्यावतीने हटवत दोन्ही ठिकाणावरील सुमारे 35 अतिक्रमित व्यावसायिकांची दुकाने हटवल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला़ चौफुल्ली अर्थातच प्रवर्तन चौकालगतचा परिसर गेल्या 25 वर्षापासून लहान-मोठे व्यावसायिकांसाठी अतिक्रमणाचा शो-पीस ठरला आहे. अतिक्रमणात व्यावसायिकाची सांगड बसत नाही तोर्पयत पुन्हा अतिक्रमण काढण्याचे भूत मानगुटीवर बसत़े असे करताना गेल्या कालखंडात लहान-मोठय़ा प्रमाणात पाचव्यांदा येथे अतिक्रमण काढण्यात आल़े कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिक्रमणामुळे वाहतुकीस होणारा अडथळा येत असल्याने पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायतीस पत्र दिल्याने अतिक्रमण काढण्यात आल्याचे बोलले जात आल़े तसेच भाजी विक्रेत्यांना बोदवड रस्त्यावरील अलंकार एम्पोरिएमसमोर ताप्तुरत्या स्वरुपात वापरण्यास देण्यात आलेल्या जागेवरून असुविधांमुळे भाजी विक्रेत्यांनी काढता पाय घेत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानालगत महाजन मेडिकलसमोरील जागेत भाजीपाला मंडी भरविली व असे करताना एका भाजीपाला विक्रेत्यावर अन्याय झाला त्याला जागाच दिली नाही. ग्रा.पं.पदाधिका:यांनी भाजी विक्रेत्यांना आपसात समझोता करून अन्याय झालेल्या विक्रे त्यास जागा देण्याबाबत तोडगा मांडला पण ही सांगड काही बसली नाही. परिणामी न्याय म्हणून रविवारी अतिक्रमण काढण्यात आल्याची चर्चा आह़ेसोमवारपासून भाजी विक्रेत्यांना नव्याने जागा आखणी करून पुन्हा भाजी बाजार भरेल, अशी अपेक्षा वजा तोडगा पुढे आला आहे. हा विषय कागदावर नसला तरी खलबते यावरच रंगले आहेत आणि निष्कर्ष ही तोडगा काढणा:यांच्या चर्चेतून बाहेर आला आहे. (वार्ताहर)