शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात फक्त ३१ टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 23:22 IST

शेतकरी वाऱ्यावर

ठळक मुद्दे जिल्हा बँकेकडून ५२ टक्के कर्जवाटप

जळगाव : खरीप पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर अखेर संपत असताना आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी केवळ ३१ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे शेतकºयांकडे बँकांनी पाठ फिरवल्याचे व शासन, प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यात अर्ज केलेल्या व पात्र शेतकºयांच्या यादीत नाव आलेल्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे खाते ‘निल’ झालेले नसल्याने ते बँकेच्या दृष्टीने थकबाकीदारच ठरले आहेत. त्यांना खरीप पीककर्ज देण्यास बँकांनी नकार दिला असल्याने त्यांना उधार उसनवाºया करून खरीप हंगामासाठी पैसा गोळा करावा लागला आहे. तर थकबाकीदार नसलेल्या शेतकºयांना देखील ५० टक्केच पीककर्ज देण्याचे धोरण जिल्हा बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे देखील शेतकºयांना पुरेशा प्रमाणात पीककर्ज मिळू शकलेले नाही.२ लाख ९४ हजार ४०० खातेदारांपैकी १ लाख ६० हजार ७४७ खातेदारांना ९२० कोटी ५५ लाखांचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेने १ लाख ३१ हजार ९३३ शेतकºयांना ४१९ कोटी ४१ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या ५२ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. मात्र त्या तुलनेत राष्टÑीयकृत व खाजगी बँकांनी म्हणजेच व्यापारी बँकांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली आहे. शासनाने वारंवार इशारा देऊनही या बँकांनी उद्दीष्टाच्या केवळ २४ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे.