शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद - जगन्नाथ शिंदे

By admin | Updated: May 24, 2017 13:17 IST

राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट संघटनेच्या राज्य बैठकीत जीएसटीसह विविध विषयांवर चर्चा

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.24- ऑनलाईन औषधी विक्रीचे घातक परिणाम असल्याने त्यावर तब्बल 70 हजार आक्षेप नोंदवूनही केंद्र सरकारच्यावतीने त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने 30 मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप पुकारला असल्याची माहिती राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगीस्ट संघटनेची राज्य बैठक 24 रोजी  जळगाव येथे केमिस्ट भवनात झाली. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे राज्य सचिव अनिल नावंदर, उपाध्यक्ष मदन पाटील, मुकुंद दुबे, सहसचिव अरुण बारसे, संघटक सचिव विनय श्रॉफ, कोषाध्यक्ष वैजनाथ जागुष्टे, जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, सी.ए. गोविंद पटवर्धन उपस्थित होते. 
ऑनलाईन औषध विक्री ही  घातक असून त्याचे विपरीत परिणाम होत आहे.आरोग्य खात्यासह कुटुंबकल्याण मंत्रायल, पंतप्रधान कार्यालय येथे निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर 15 मार्च 2017 रोजी केंद्र सरकारने डॉ. हर्षवर्धन कांबळे यांच्या अहवालानुसार नोटीस काढल्या. या नोटीसची मुदत 15 एप्रिल रोजी संपली असली तरी त्यानंतर आतार्पयत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे शिंदे म्हणाले. 
या बैठकीत जीएसटीविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले. जीएसटीचा औषध व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो व त्याच्या नोंदणाविषयी आवाहन करून जगन्नाथ शिंदे यांनी जीएसटीला संघटनेचा पाठिंबा राहील, असे सांगितले. 
पंतप्रधानांनी जेनेरिक औषधी लिहून देण्याबाबत डॉक्टरांना आवाहन केले आहे, त्यानुसार जेनेरिक विषयावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.  प्रास्ताविक सुनील भंगाळे यांनी तर सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.