शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ३० हजार कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:41 IST

आढावा बैठक

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सर्व विभागांकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागविणे सुरू ७ दिवसांत मागविली माहिती

जळगाव- लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ३० हजार अधिकारी व कर्मचाºयांचे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रमुखांकडून त्यांच्याकडे असलेल्या मनुष्यबळाची माहितीमागविण्यात आली आहे. त्यापैकी ५० टक्केच माहिती मिळाली असल्याने बुधवार, २८ रोजी याबाबत आढावा बैठक होऊन उर्वरित माहिती ७ दिवसांत मागविण्यात आली.लोकसभा निवडणुकांसाठी एप्रिल महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामाला गती देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया तसेच मतमोजणी व विविध पथकांसाठी एकूण ३० हजार मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी जिल्ह्यातील सर्व केंद्र व राज्य शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, राष्टÑीयकृत बँकांच्या विभाग प्रमुखांकडून त्यांच्याकडील उपलब्ध मनुष्यबळाची माहिती मागविली होती. ही माहिती तालुकास्तरावर संकलीत होऊन जिल्ह्याला एनआयसीत एकत्रित केली जात आहे. या माहिती संकलनासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची नोडल आॅफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.७ दिवसांत मागविली माहितीआतापर्यंत ५० टक्केच माहिती प्राप्त झाली असल्याने बुधवार, २८ रोजी याबाबत बैठक झाली. त्यास निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, एनआयसीचे प्रमोद बोराले, पत्की, नोडल आॅफीसर उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे , तहसीलदार अमोल निकम तसेच माहिती सादर न केलेल्या विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यात उर्वरीत माहिती ७ दिवसांत मागविण्यात आली आहे.