शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातून ३०० कोटीची वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 10:10 IST

मंत्रालयातून दखल

ठळक मुद्दे चौकशीचे आदेश

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणेसीम येथे सुमारे ३०० कोटींची वाळू चोरी झाल्याचा आरोप झाल्याने व वाळूचोरांना मारहाण केल्याने गाजत असलेल्या या प्रकरणाचे पडसाद बुधवार, २३ रोजी मंत्रालय स्तरावरही उमटले. महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी प्रकरणाची व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्हाधिकाºयांनी असे आदेश आल्याचा ‘इन्कार’ केला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी महसूलमंत्र्यांना पत्र देत ३०० कोटीची वाळू चोरी झाल्याचा आरोप केला आहे.हिंगोणेसीम गावाला लागून असलेल्या तितूर नदी पात्रात गेल्या वर्षभरापासून १५ लाख घनफूट अवैधरित्या वाळूचा उपसा झाला आहे. ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे अनेकवेळा तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. २२ रोजी पहाटे चार वाजता सरपंच ज्ञानेश्वर महाजन व संतप्त ग्रामस्थांनी वाळूचा उपसा करणाºया जेसीबीने डंपर भरले जात असताना पकडले. जेसीबी हे माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी यांचे असून ते व डंपर चालक कोळी पळून गेले.मुंडेंचे महसूलमंत्र्यांना पत्रविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना याप्रकरणी पत्र देऊन महसूल अधिकारी व पोलिसांच्या संगनमताने तितूर नदीतून ३०० कोटी रूपये किंमतीच्या १५ लाख घनफूट वाळूची चोरी झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.