शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावचे ८६ वर्षीय शिवाजी मराठे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आठवणींना दिला रोमांचकारी उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:40 IST

‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिन विशेष :भारत मातेच्या जयजयकारात फडकला तिरंगा !

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : ‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतुहलाने हे सर्व पाहत होतो. आम्हाला मिठाईदेखील मिळाली...’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ८६ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक शिवाजी विठ्ठल मराठे यांना स्वातंत्र्याच्या रोमांचकारी आठवणी जागविताना गहिवरुन आले होते.शिवाजी मराठे यांच्या मनात बालपणीच देशभक्तीची ज्योत पेटली होती. घरची परिस्थिती बेताची असली तरी देशासाठी काही तरी करण्याचा संकल्पही त्यांनी मनोमन रुजवून घेतला होता. १९५५ मध्ये झालेल्या गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात हाती तिरंगा घेऊन त्यांनी सहभाग घेतला. ७३ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावर्षी १९४७ मध्ये ते पालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत होते. त्यांचं वय होतं अवघे आठ वर्ष. पंचायत समिती कार्यालयाजवळ पालिकेची क्रमांक तीन ही त्यांची शाळा.रेडिओवरील भाषणांनी मिळाली प्रेरणास्वातंत्र्य दिनाच्या आठवणींचा जागर करताना ते म्हणाले, 'मी लहान होतो. फारसं काही समजतही नव्हतं. वडील आणि शिक्षकांची शिस्त फारच कडक होती. अधून-मधून मोठ्या माणसांच्या गप्पांमध्ये स्वातंत्र्य- पारतंत्र्य, स्वातंत्र्य लढा असे शब्द ऐकायला मिळायचे. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची भाषणे रेडिओवरुन ऐकली जायची. रेडिओवरील भाषणे ऐकण्यासाठीही गर्दी व्हायची. ही भाषणे प्रेरणादायी असायची...’ १५ आॅगस्ट १९४७ची आठवण सांगताना त्यांचे डोळे भरुन आले. ते म्हणाले, ‘तो दिवस अजूनही स्मरणात आहे. त्यादिवशी भारत स्वातंत्र्य झाला म्हणून वंदे मातरमसह भारतमातेचा झालेला गजर अजूनही कानात रेंगाळतोय. मिळालेल्या मिठाईची चवही जिभेवर आहेच. शेवटच्या श्वासापर्यंत या आठवणी कायमच ताज्या राहतील...’स्वार्थ बळावतो आहेसद्य:स्थितीबाबत ते व्यथित होऊन म्हणाले, ‘युवापिढी चंगळवादासोबतच फेसबुकी आणि सेल्फीवादी झाली आहे. स्वार्थ बळावले आहे. राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव जाणवतो. ही लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. देशप्रेमाची ज्योत ही प्रत्येकाच्या मनात कायम तेवत रहावी...’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.काश्मीरबाबतचा निर्णय योग्यच‘काश्मीरमधील ३७० कलम हटवून आपल्या पंतप्रधानांनी संपूर्ण विश्वालाच भारतीय सार्वभौमत्वाचा योग्य तो संदेश दिला आहे. यामुळे काश्मीर खोऱ्याला आता विकासाच्या प्रवाहात येता येईल. बहुमताचे सरकार असल्यानेच असे ऐतिहासिक निर्णय घेता येतात.. सरकार कुणाचेही असो त्याचा पाया देशप्रेमावर रचलेला असला पाहिजे....' काश्मीर निर्णयाविषयीदेखील अशा शब्दात शिवाजी मराठे यांनी सरकारची पाठराखण केली.आंदोलनात सहभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवशिवाजी मराठे यांनी १९५५ मध्ये गोवा मुक्तीसंग्राम आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्याकाळी ते १५ दिवस गोव्यात होते. २०१७ मध्ये १९४२च्या 'चले जाव' आंदोलनाच्या अमृत महोत्सवाच्या स्फूर्तीदायी पर्वणीवर शिवाजी मराठे यांचा भारतभरातील इतर स्वातंत्र्य सैनिकांसोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालिन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात यथोचित गौरव करण्यात आला आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनChalisgaonचाळीसगाव