जळगाव : जिल्हाभरात बुधवारी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत पुन्हा नवा उच्चांक नोंदविला गेला. एका दिवसात तब्बल ७७ हजार ४१३ नागरिकांनी लस घेतली. यात ५९ हजार २७४ नागरिकांनी या लसीचा पहिला डोस घेतला असून, गेल्या आठ महिन्यातील ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. ऑगस्ट महिन्यात ३ लाख ८४ हजार नागरिकांनी लस घेतली असून, हा आजपर्यंतच्या महिन्यांचा उच्चांक आहे. शिवाय मिळालेल्या माहितीनुसार एका दिवसात सर्वाधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यात जळगाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आलेले डोस त्याच दिवशी संपवावेत, असे शासनाचे निर्देश असून, त्यादृष्टीने आलेल्या डोसचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी केंद्रावर लसींचे वाटप केले असून, त्यानुसार एकाच दिवसात ७७ हजारांचे लसीकरण झाले आहे. गेल्या दोन दिवसात पुन्हा सव्वा लाख डोसची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
तरूणच पुढे
१८ ते ४४ : ५,५३,०४५
४५ ते ६० : ४,७१,४५२
६० वर्षांवरील : ३,९९,१०३
असा वाढला एका दिवसातील लसीकरणाचा आलेख
५ ऑगस्ट १७,१४७
१४ ऑगस्ट २९,६३४
२१ ऑगस्ट ४९,४९१
२७ ऑगस्ट ५३,३०३
३० ऑगस्ट ५५,८०३
१ सप्टेंबर ७७,५१३
पुरूष : ७,५१,२८१
महिला : ६,७२,१७६
कोविशिल्ड : १२,४९,८६४
कोव्हॅक्सिन : १,७३,२०८
कोट
जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा वाढविण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत असून, लसीच्या उपलब्धतेनुसार दरदिवशी प्रत्येक केंद्रावर १ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीचा पुरवठा याचप्रमाणे प्राप्त झाल्यास प्रतिदिन १ लाख लसीकरणाचे प्रशासनाने उद्दिष्ट आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यांत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करू शकू. - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत