शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन उपमहापौरांसह फुटलेले २७ नगरसेवक शहरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधून फुटून नवीन २७ जणांचा गट तयार करून महापालिकेत सत्तांतर करणाऱ्या भाजपच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधून फुटून नवीन २७ जणांचा गट तयार करून महापालिकेत सत्तांतर करणाऱ्या भाजपच्या बंडखोर २७ नगरसेवकांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. तसेच नूतन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीदेखील शुक्रवारी सकाळी ११ वाजता भाजपच्या बंडखोर उमेदवारांसह महापालिकेत दाखल होऊन उपमहापौर पदाची सूत्रे हाती घेतली. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी महापालिकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

भाजपच्या २७ नगरसेवकांच्या एक गटाने बंडखोरी केली. या गटाने विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला मदत केल्याने महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर, तर फुटीर गटातून कुलभूषण पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शिवसेनेकडून सहलीवर असलेले कुलभूषण पाटील यांच्यासह फुटीर २७ नगरसेवक शुक्रवारी जळगावात दाखल झाले. अडीच वर्षांच्या काळात रस्त्यांसह इतर विकासकामे झालेली नाहीत; त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय हा शहराच्या विकासकामांसाठी घेतला. कुठलाही घोडेबाजार यात झालेला नसल्याची माहिती या फुटीर नगरसेवकांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी नूतन उपमहापौर यांचा सत्कार केला. माजी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक चेतन सनकत, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पती सुधीर पाटील, नगरसेविका पती कुंदन काळे हे भाजप बंडखोर यावेळी उपस्थित होते. गजानन मालपुरे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, आदी यावेळी उपस्थित होते.

गिरीश महाजनांनी केवळ आश्वासन द्यायचे काम केले

नूतन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह २७ नगरसेवकांनी माध्यमांशी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा-जेव्हा आम्ही कामे घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जायचो, त्यावेळी आम्हाला केवळ आश्‍वासने मिळत असत. जी कामे झाली ती ठरावीक नगरसेवकांच्या वॉर्डात झाली. मग आपल्या वाॅर्डाचे काय? मतदारांना काय? उत्तरे द्यावयाची? अडीच वर्षांनी कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जायचे. यामुळे बंडखोरी करून शिवसेनेला पाठिंबा द्यायचा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतला. शिवसेनेची राज्यात सत्ता असल्याने विकासासाठी शासनाकडून निधीही आणता येणार आहे. शहराच्या विकासासाठीच आम्ही बंडखोरी केल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्ता बदलताच महापौर दालन पूर्ववत सतराव्या मजल्यावर!

महापौर कार्यालय पूर्वी सतराव्या मजल्यावर होते. अडीच वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन महापौर सीमा भोळे यांनी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर आणले. आता महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आली. शुक्रवारी दुसऱ्याच दिवशी महापौर कार्यालय पूर्ववत सतराव्या मजल्यावर हलविण्यात आले आहे.