शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा उद्या २६ वा दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:14 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ व्या पदवीप्रदान समारंभाचे मंगळवारी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात पार पडणार असून, ३५ हजार १६२ स्रातकांना पदव्या, ८४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर २२२ विद्यार्थ्यांना पीएच.डी.बहाल करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेत स्थायिक झालेले अनिवासी भारतीय सुप्रसिध्द वैज्ञानिक व उद्योजक डॉ.अशोक जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्दे३५ हजार स्रातकांना देणार पदव्या उद्योजक डॉ.अशोक जोशी यांची उपस्थिती८४ विद्यार्थ्यांना देणार सुवर्णपदक

आॅनलाईन लोकमत

जळगाव-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ व्या पदवीप्रदान समारंभाचे मंगळवारी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात पार पडणार असून, ३५ हजार १६२ स्रातकांना पदव्या, ८४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर २२२ विद्यार्थ्यांना पीएच.डी.बहाल करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेत स्थायिक झालेले अनिवासी भारतीय सुप्रसिध्द वैज्ञानिक  व उद्योजक डॉ.अशोक जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाने दीक्षांत सोहळ्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. कार्यक्रमाला कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.बी.पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामु पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठाकडून अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यार्थी परिषदेचे सदस्य व विविध महाविद्यालयातील प्राचार्य देखील उपस्थित राहणार आहेत.  यावर्षी प्रथमच पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यंदा पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव छापण्यात आले आहे. तसेच स्नातकाच्या आईचे नाव देखील प्रमाणपत्रावर असणार आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर  कोड राहणार असून या कोडचा उपयोग मोबाईल अ‍ॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणीसाठी होणार आहे.

कोण आहेत डॉ.अशोक जोशीडॉ.अशोक जोशी हे अमेरिकेच्या वैज्ञानिक आणि उद्योजक क्षेत्रातील मोठे नाव आहे. ९९६६ मध्ये पुणे येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरींग येथून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या अशोक जोशी यांनी १९७० मध्ये अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातून एम.एस. आणि १९७२ मध्ये पीएच.डी पदवी प्राप्त केली. १९७३ मध्ये पेन्सेलव्हेनिया विद्यापीठातून ते पोस्ट डॉक्टरल झाले. अमेरिकेतील  मान्यताप्राप्त संशोधक आणि  उच्च तंत्रज्ञानातील उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. ऊर्जा, पर्यावरण, जौवतंत्रज्ञान या क्षेत्रात त्यांनी नाविन्यपूर्ण  तंत्रज्ञान विकसित केलेले असून १०० पेक्षा अधिक अमेरिकन पेटंट त्यांच्या नावावर आहेत. भारतातील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. 

प्रत्यक्ष पदवीघेण्यासाठी २१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी पदवीप्रदान समारंभात ३५ हजार १६४ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ११ हजार ९२५ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३ हजार ३२५ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार २४२ आणि आंतर विद्याशाखेचे ६६३ स्नातकांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे.  या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये २२२ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.