शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

२६ लाख थकविल्याने कॉम्प्टनविरोधात तक्रार

By admin | Updated: May 9, 2014 09:38 IST

वीज चोरी करणार्‍या ग्राहकांकडून तडजोड शुल्काच्या स्वरूपात वसूल केलेली २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात न भरल्याने क्रॉम्प्टनच्या विरोधात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

जळगाव : वीज चोरी करणार्‍या ग्राहकांकडून तडजोड शुल्काच्या स्वरूपात वसूल केलेली २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात न भरल्याने क्रॉम्प्टनच्या विरोधात वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पोलिसांनी क्रॉम्प्टनला याप्रकरणी आपले म्हणणे सादर करावे यासाठी पत्र दिले आहे.जळगाव शहर व तालुक्यासाठी वीज वितरण कंपनी आणि क्रॉम्प्टन यांच्यात १ नोव्हेंबर २०११ पासून करार झाला आहे. जळगाव शहर आणि तालुक्यातील वीज वितरण, देखभाल दुरुस्ती आणि विज बिल वसुलीचा ठेका क्रॉम्प्टनला देण्यात आला आहे. या दरम्यान विद्युत कायदा कलम २००३ प्रमाणे वीज चोरी करणार्‍या काही ग्राहकांवर वीज कंपनी व क्रॉम्प्टन यांच्यातर्फे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर ४२ जणांकडून तडजोड शुल्क म्हणून क्रॉम्प्टनने २६ लाख ५१ हजार रुपये वसूल केले आहेत. ही रक्कम त्यांनी शासनाच्या खात्यात जमा करणे अपेक्षित होते. मार्च २०१४ पर्यंत त्यांनी ती रक्कम जमा न केल्याने कार्यकारी अभियंता सुभाषचंद्र सदावर्ते यांनी लेखी पत्र देऊन विचारणा केली होती. त्यानंतरही क्रॉम्प्टनकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने सदावर्ते यांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याचे नमूद करीत क्रॉम्प्टनच्या नावाने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी क्रॉम्प्टनच्या अधिकार्‍यांना या प्रकरणात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपले म्हणणे सादर करावे या आशयाचे पत्र दिले. त्यानुसार गुरुवारी दुपारी क्रॉम्प्टनचे व्यवस्थापक (लिगल) नईम रज्जाक यांना जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जाऊन कंपनीची बाजू मांडली. शुक्रवारी संध्याकाळी कंपनीतर्फे आपले म्हणणे सादर केले जाईल असे त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना सांगितले.