शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

तालुक्यातील २५गावे वगळली

By admin | Updated: August 27, 2014 15:17 IST

तालुक्यातील २५ गावे आदिवासी क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. वास्तविक या गावांमध्ये ९८ टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासींची आहे.

नंदुरबार :तालुक्यातील २५ गावे आदिवासी क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. वास्तविक या गावांमध्ये ९८ टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासींची आहे. असे असताना ही गावे वगळल्याच्या निषेधार्थ डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हजारो आदिवासी या मोर्चात सहभागी झाले होते.
नंदुरबार तालुक्यातील हजारो आदिवासी दुपारी महाराणा प्रताप चौकात जमले होते. तेथून त्यांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे जिल्हाधिकार्‍याना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जून २0१४च्या राजपत्रात नंदुरबार तहसील अनुसूचित क्षेत्र जाहीर केले आहे. त्यात जाहीर करण्यात आलेल्या गाव, पाडे, वस्त्या यानुसार आदिवासी उपयोजना क्षेत्रात नंदुरबार तालुक्यात ९७ ग्रामपंचायती, १0७ गावे समाविष्ट असून राजपत्रात फक्त ८२गावांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित २५ गावे समाविष्ट नाहीत. यामुळे विशेष अधिकाराच्या लाभापासून आदिवासी नागरिक, सुशिक्षित बेरोजगार तरुण वंचित राहणार आहेत. शासन निर्णयानुसार माडा, मिनीमाडा, आदिवासी उपयोजना क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र ठरविण्यात आले आहे. वास्तविक वगळण्यात आलेल्या या गावपाड्यांमध्ये ९७ ते १00टक्के आदिवासी जनता राहते. या निर्णयामुळे सुशिक्षित आदिवासी तरुणांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या भरतीवरही टाच आली आहे. त्यामुळे आदिवासी बेरोजगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या सर्व बाबींचा विचार व्हावा याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून पुन्हा या गावांना आदिवासी योजनेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 
मोर्चाचे नेतृत्व डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी यांनी केले. या वेळी राजेंद्र पवार, रमेश गावीत, धरमदास बागुल, भरत बागुल, दत्तू चौरे, देवमन चौरे, देवमन पवार, शत्रुघ्न गांगुर्डे, पूनम बागुल, सोमा गांगुर्डे, उत्तम चौरे, रामलाल बागुल आदींसह हजारो आदिवासी युवक व नागरिक सहभागी झाले होते. 
 
■ नंदुरबार तालुक्यातील देवपूर, भवानीपाडा, निमगाव, पिंप्री, वडगाव, बालआमराई, काळंबा, पाचोराबारी, सोनगीर, सुतारे, अंबापूर, हरिपूर, नवागाव, श्रीरामपूर, अजेपूर, घोगळगाव, गंगापूर, तारापूर, राजापूर, ईसाईनगर, शिवपूर, नंदपूर, मालपूर, वागशेपा, उमरगाव, चौपाळे, नांदर्खेपैकी टाकळीपाडा, वाघाळेपैकी काळटोमी या गावांचा समावेश आहे. या गावांना वगळले