शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ‘डीपीडीसी’वर 25 सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 11:47 IST

नऊ जागांसाठी होणार निवडणूक : उशिरा पोहचल्याने ग्रामीण मतदारसंघातील एक अर्ज कायम

ठळक मुद्दे 26 उमेदवार रिंगणात 7 सप्टेंबर रोजी मतदान ग्रामीण मतदारसंघाच्या आठ जागा यापूर्वीच बिनविरोध

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) सदस्य निवडणुकीत बुधवारी माघारीच्या दिवशी जिल्हा परिषद गटातील 17 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. एक सदस्य माघार घेण्यासाठी निर्धारीत वेळेपक्षा उशिरा पोहचल्याने त्यांचा अर्ज कायम राहिला आहे. आता पालिका गटातील आठ जागांसाठी 23 व जिल्हा परिषद गटातील 2 जागांसाठी 3 असे 26 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी आता 7 सप्टेंबर रोजी मतदान होईल. यापूर्वी आठ महिला बिनविरोध झाल्या होत्या. ग्रामीण मतदारसंघाच्या (जिल्हा परिषद) 27 तर लहान नागरी मतदारसंघाच्या (पालिके) 9 अशा एकूण 36 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. ग्रामीण मतदारसंघाच्या आठ जागा यापूर्वीच बिनविरोध झालेल्या आहेत. तर लहान नागरी मतदारसंघाच्या अनुसुचित जमातीसाठी एक जागा रिक्त राहणार आहे. येथे दोघे महिलांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे 27 जागांसाठी निवडणूक होणार होती. त्यात लहान नागरी मतदारसंघाच्या आठ जागा व ग्रामीण मतदारसंघाच्या  19 जागांवर उमेदवार होते. आता ग्रामीण मतदारसंघाच्या 19 पैकी 18 जागांवरील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी राहुल मुंडके काम पाहत आहेत. लहान नागरी मतदारसंघातील रिंगणातील उमेदवार असे : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (एक जागा) - विजया पवार, जयश्री पाटील, कल्पना महाजन. नागरिकांचा मागास प्रवर्ग (एक जागा)- प्रवीण चौधरी, राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे. सर्वसाधारण महिला प्रवर्ग (तीन जागा) - विजया जावळे, पुष्पलता पाटील, कल्पना महाजन, सोनल महाजन, वर्षा शिंदे. सर्व साधारण प्रवर्ग (दोन जागा) -सुनील काळे, राजेंद्र चौधरी, यशवंत दलाल, भालचंद्र जाधव, पुष्पलता पाटील, मनोज पाटील, मुकेश पाटील, विनय भावे, मंगेश तांबे, महेंद्र धनगर, अमोल शिंदे, मिलिंद वाघुळदे. ग्रामीण मतदारसंघातील यापूर्वी बिनविरोध झालेल्या महिला सदस्या अशा (सर्वसाधारण) नीलम शशिकांत पाटील, वर्षा रामदास पाटील, पल्लवी जितेंद्रपाटील, विद्या दिलीप खोडपे, धनुबाई आंबटकर, कल्पना पाटील, जयश्री अनिल पाटील, विजयाबाई पाटील. ग्रामीण मतदार संघातील बिनविरोध झालेले उमेदवारअनुसुचित जाती- जयपाल बोदडे, अनुसुचित  जाती (महिला) - सविता भालेराव,  अनुसुचित जमाती-  नीलेश पाटील, प्रभाकर सोनवणे, ना.मा.प्र. (महिला)- माधुरी अत्तरदे, नंदा पाटील, मिना पाटील.पूर्ण माहिती मिळेनाजिल्हा प्रशासनातर्फे ग्रामीण मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गातील 8 जागा व अनुसुचीत जमाती महिला प्रवर्गाच्या 2 जागांसाठी कोणत्या उमेदवारांनी माघार घेतली? व कोणते उमेदवार बिनविरोध झाले याची माहिती रात्री उशीरार्पयत उपलब्ध होऊ शकली नाही. ग्रामीण मतदारसंघातील ना.मा.प्र.साठी मतदाऩ ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निवडणक होणार आहे. यासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये गोपाल चौधरी, भूषण पाटील, हिंमत पाटील हे रिंगणात आहेत.