शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तरसोदच्या निवृत्त मुख्याध्यापकास 24 हजाराचा ऑनलाईन गंडा

By admin | Updated: February 10, 2017 00:43 IST

एटीएमचा विचारला कोड :20 मिनिटात दोन वेळा काढले पैसे

जळगाव : ‘तुमचे एटीएम बंद झाले आहे, ते सुरु करुन देतो’ असे सांगून ‘एटीएम’वरील कोड विचारुन तरसोद (ता.जळगाव) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची 23 हजार 500 रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर कक्षातील कर्मचा:यांनी तत्काळ खाते बंद करुन सूत्र हलविल्याने त्यातील 18 हजार 500 रुपये 24 तासात परत मिळविले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, तरसोद येथील रहिवाशी तुकाराम खंडू पाटील हे जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. नशिराबाद येथील युनियन बॅँकेत त्यांचे बचत खाते आहे. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. मी मुंबईच्या बॅँकेतून शर्मा बोलतो आहे, असे सांगून त्याने पाटील यांना तुमचे बॅँक खाते आधारकार्डशी न जोडल्यामुळे तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. हे एटीएम मी सुरु करुन देतो त्यासाठी जुन्या एटीएमवरील क्रमांक विचारला. हा क्रमांक घेतल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल असे सांगितले. थोडय़ा वेळाने एटीएमचा ‘ओटीपी’ (ऑनलाईन ट्रान्झक्शन पासवर्ड) विचारला. पाटील यांनी तोही क्रमांक दिला. ही सर्व माहिती संबंधित  व्यक्तीने विश्वासात घेवून विचारली. मोबाईल बंद झाल्यानंतर पाटील यांच्या खात्यातील 18 हजार 500 रुपये व त्यानंतर पुन्हा 5 हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला.

सायबर कक्षाच्या कर्मचा:यांनी हलविले सूत्रबॅँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मी तुमच्या बॅँकेत येतो असे सांगितले, मात्र त्यांनी तुम्ही येवू नका तुमचे काम झाले असे सांगून फोन बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांना हा प्रकार संध्याकाळी मुलगा प्रफुल्ल पाटील यांना सांगितला. दुस:या दिवशी दोघंही पिता-पूत्र स्थानिक गुन्हे शाखेत आले. तेथील कर्मचारी संदीप साळवे, श्रीकृष्ण पटवर्धन, जयंत चौधरी, विजय चौधरी व नरेंद्र वारुळे यांनी संपूर्ण माहिती समजून घेत पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या सल्ल्याने तातडीने ऑनलाईन सूत्र हलविले. त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळाला व दुस:या दिवशी 18 हजार 500 रुपये परत मिळण्याचे संकेत मिळाले. दरम्यान, ही प्रक्रिया करीत असतानाही पाटील यांना संबंधित व्यक्तीचा त्यांना फोन आला होता. ही व्यक्ती आसामची असल्याचे निष्पन्न झाले.

 

एटीएमचे पासवर्ड विचारुन ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही बँक खातेदारांना फोन करीत नाहीत व माहिती विचारत नाहीत,त्यामुळे नागरिकांनी कोणालाही फोनवर माहिती देवू नये. माहिती विचारण्याचा प्रय} झाला तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.-डॉ.जालिंदर सुपेकर,  पोलीस अधीक्षक