शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यात २२ कोटी रुपये दुष्काळी अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:15 IST

१९ हजार २५६ शेतकऱ्यांना लाभ ; वंचित शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा

भडगाव : शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केला असल्याने भडगाव तहसील प्रशासनास शासनाकङुन २२ कोटी ६२ हजार ६५२ रुपये दुष्काळी अनुदानाची रक्कम प्राप्त झाली होती. बहुतांश रक्कम ही मार्च अखेरीसच तालुक्यात वाटप करण्यात आली आहे. यात जिरायत व बहुवार्षिक फळबागायती क्षेत्राचा समावेश आहे.जिरायत क्षेत्रासाठी एकुण १७ कोटी ९२ लाख ८५ हजार ६८४ इतके दुष्काळी अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात आले आहे. तसेच बहुवार्षिक फळपिकासाठी एकूण १३ कोटीपैकी मार्चअखेर ४ कोटी ७ लाख ७६ हजार ९६८ रुपयांचे अनुदान वाटपाची कार्यवाही महसुल प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. बहुवार्षिक फळपिकाचा लाभ तालुक्यात एकूण ५ हजार ४११ शेतकºयांना मिळाला आहे. जिरायत व बहुवार्षिक फळपिकाचा अनुदानाचा लाभ तालुक्यात एकुण १९ हजार २५६ शेतकºयांना मिळाला आहे.भडगाव तहसील प्रशासनामार्फत अनुदान वाटपाची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात आली असली तरी आता उर्वरीत वंचित शेतकºयांना दुष्काळी अनुदानाचा लाभ तात्काळ मिळावा, अशी मागणी तालुक्यातील अनुदानापासुन वंचित शेतकरी वर्गातून होत आहे. जिरायत क्षेत्रासाठी ६८०० रुपये तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार रुपये अनुदानाची रक्कम शेतकºयांना मिळणार आहे. सुरुवातीस जिरायत क्षेत्रासाठीच सहा हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान वाटपाची कार्यवाही करण्यात आली. फळपिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बहुवार्षीक फळपिकाचे अनुदान तालुक्यात वाटप करण्यात आले आहे.पिकांचे झाले होते नुकसानभडगाव तालुक्यात खरीप हंगाम सन २०१८ ला कमी पावसाळा झाला. त्यात पाणी टंचाई पाहता शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती पिकांवर केलेला शेतकºयांचा खर्चही निघाला नाही. शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शेतकºयांसह सर्व स्तरातून करण्यात आली. आमदार किशोर पाटील यांनीही भडगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी लावून धरली होती. राष्ट्रवादी काँग्रसमार्फतही निवेदने शासनास दिली होती. सर्व स्थिती पाहता शासनाने भडगाव तालुका दुष्काळी जाहीर केला.अनुदानासाठी२ हेक्टरची मर्यादाशासनाने जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी ६८०० रुपये तर बहुवार्षीक फळपिकांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी अनुदानाची रक्कम जाहीर केली आहे. शेतकºयांना यासाठी २ हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे. दुष्काळी अनुदानाची तालुक्यासाठी तहसील प्रशासनाने एकुण २५ कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. यापैकी तहसील प्रशासनास आतापर्यंत एकुण २२ कोटी रुपये अनुदानाची रक्कम प्राप्त झाली होती. अनुदान वाटपाची कार्यवाही, याद्या बनविणे आदी कामे महसुल प्रशासनामार्फत युद्धपातळीवर वेळोवेळी होत असल्याचे दिसून आले.यापूर्वीच गावागावात तलाठी कार्यालयात बँक अकाऊंट नंबर आदी देण्यासाठी शेतकरी वर्ग गर्दीने दिसून येत होते.याबाबत तहसीलदार यांनी तालुक्यातील तलाठ्यांची बैठक घेतली होती. ही अनुदानाची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर तहसील प्रशासन धनादेशद्धारे जमा करण्यात आली आहे. अनुदानाची रक्कम काढण्यासाठी शेतकºयांची शहरासह तालुक्यातील बँकांवर अजूनही गर्दी दिसून येत आहे.