शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:33 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : नगराध्यक्षांचा निर्णय राखीव ; ८ नगरसेवकांची नंतर होईल सुनावणी

अमळनेर : एका व्यापाºयाचे अतिक्रमण काढण्यास स्थगिती देण्याचा ठराव केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी २२ नगरसेवकांना दुसºयांदा अपात्र केले आहे. दरम्यान, नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपील दाखल करण्याची पुन्हा संधी दिली आहेअमळनेरच्या बाजरपेठेतील एका व्यापाºयाचे अतिक्रमण काढण्याबाबत नगरपरिषदेने ११ व १५ एप्रिल १७ रोजी कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवत स्थगिती दिली होती. त्यानंतर ती स्थगिती उठवली होती. मात्र आमदार शिरीष चौधरी गटातील प्रवीण पाठक, सविता संदानशिव, सलीम शेख चिरागोद्दीन यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्यासह उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, शीतल राजेंद्र यादव, नूतन महेश पाटील, संतोष भगवान पाटील, सुरेश आत्माराम पाटील, नरेंद्र रामभाऊ संदानशिव, निशांतबानो अनिसखान कुरेशी, मनोज भाऊराव पाटील, गायत्री दीपक पाटील, अ‍ॅड.चेतना यज्ञेश्वर पाटील, विवेक भीमराव पाटील, निशांत राजेंद्र अग्रवाल, संजय आनंदा मराठे, चंद्रकला अशोक साळुंखे, रामकृष्ण बापूराव पाटील, राजेश शिवाजीराव पाटील, कमलबाई पितांबर पाटील, रत्नमाला साखरलाल महाजन, रत्ना प्रकाश महाजन, प्रवीण साहेबराव पाटील, सलीम शेख फत्तु, अभिषेक विनोद पाटील या २२ नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव पाठवला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी २९ जानेवारी १८ रोजी नगराध्यक्षांसह २३ नगरसेवकांना अपात्र ठरवले होते. मात्र त्यानंतर लगेच नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे अपील दाखल करून स्थगिती मिळवली होती.सुनावणीनंतर दिलेल्या निकालात त्यांनी जिल्हाधिकाºयांना अध्यक्षांबाबत अधिकार नाही म्हणून मत मागवून २२ नगरसेवकांबद्दल नव्याने निर्णय घेण्याचे निर्देशित केले होते. मात्र निर्णयास विलंब होत असल्याने आमदार शिरिष चौधरी गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या.जामदार यांनी नगराध्यक्षांबाबत निकाल राखीव ठेवत २२ नगरसेवकांबाबत दोन आठवड्यात निर्णय देण्याचे आदेश दिले होते.जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पुन्हा सुनावणी घेऊन २० रोजी उपनगराध्यक्षांसह २२ नगरसेवकांना नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (१)(इ) प्रमाणे अपात्र ठरवले आहे. या निकालाच्या प्रति मिळाल्यापासून नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे दोन आठवड्याच्या आत त्यांना अपील दाखल करता येणार आहे.तत्कालीन मुख्याधिकारी यांनी आपल्या कामात कसूर केल्याने त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव डायरेक्टर आॅफ म्युनिसिपल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.तसेच उर्वरित १६ नगरसेवकांपैकी ८ नगरसेवकांनी ठरावाचे समर्थन केले असल्याने त्यांच्याबाबत स्वतंत्र बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध योग्य तो आदेश पारित होणार आहे...........तीन बैठकांचे इतिवृत्त कायम करण्याचा ठराव एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न सत्ताधाºयांनी केला होता. शिरीष चौधरी मित्र परिवाराच्या ४ व शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी १५ एप्रिल च्या ठरावाला कायम करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र सत्ताधाºयांनी विरोधाचा विचार न करता सत्तेचा दुरुपयोग करून ठराव मंजूर केला होता. त्यामुळे सत्य परिस्थिती निदर्शनास आणून त्या आठ नगरसेवकांचा बचाव करणार.- प्रवीण पाठक, विरोधी पक्ष गटनेता, तथा तक्रारदार.जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे अपील दाखल करण्यात येईल यापूर्वी राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारीच्या अपात्रतेच्या निर्णयाविरुद्ध निर्णय दिलेला आहे. त्यामुळे रास्त बाजू मांडून अपात्र नगरसेवकांना न्याय मिळवून देवू.-पुष्पलता पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा, अमळनेर नगरपरिषद.