शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'आरटीई' शुल्क प्रतिपूर्तीचे २१ कोटी शासनाकडे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) होणा-या प्रवेशांसाठी राज्य शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिल्या जाणा-या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) होणा-या प्रवेशांसाठी राज्य शासनाकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिल्या जाणा-या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम गेल्या तीन वर्षांपासून थकीत आहे. थकीत रक्कम ही तब्बल २१ कोटी ३८ लाख २ हजार ९१ रूपयांवर पोहोचली असून प्रतिपूर्ती मिळत नसल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांसमोर आता आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशांची राज्य शासनाकडून शाळांना शुल्क प्रतिपूर्ती केली जाते. मात्र, ही प्रतिपूर्ती नियमितपणे होत नसल्याने खासगी शाळांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी जळगाव जिल्ह्यात अडीचशेच्यावर शाळांमध्ये आरटीईतंर्गत विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, जळगाव जिल्ह्यातील शाळांची गेल्या तीन वर्षांपासूनची शुल्क प्रतिपूर्ती राज्य शासनाकडे थकीत आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षाची सुमारे २१ कोटी ३८ लाख रूपयांची थकबाकी शासनाकडे असल्याची माहिती समोर आली आहे.

तुटपूंजे अनुदान मिळते...

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाने जळगाव शिक्षण विभागाला केवळ १ कोटी ८७ हजार रूपये अनुदान दिले होते. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची आरटीई शुल्क प्रतिपूर्ती सुध्दा शाळा पन्नास टक्केच करण्‍यात आली होती. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी राबविण्‍यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून १ कोटी ५७ लाख ७६ हजार रूपये मंजूर झाले आहे. हा निधी अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही. काही दिवसात शिक्षण विभागाला हे अनुदान मिळताच ते शाळांना वर्ग करण्‍यात येणार आहे.

प्रतिपूर्तीची प्रतीक्षा

२१ कोटी रूपयांची शासनाकडे आरटीई प्रतिपूर्तीची थकबाकी असताना, सुध्दा शासनाकडे दरवर्षी तुटपूंजे अनुदान मिळत आहे. परिणामी, आता खाजगी शाळांपुढे आर्थिक संकट उभे राहिले. यामुळे राज्यातील काही शाळांनी प्रतिपूर्ती न मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही. असा पवित्रा घेतला आहे.

परतावा मिळत नसेल तर ॲडमिशन का द्यावे

शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुध्दा शासनाकडून दखल घेतली जात नाही. शाळा बंद पडण्यावर आल्या आहेत. शिक्षकांना पगार नाहीत. इमारती भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत. वाहने कर्जाने घेतली आहेत. त्यात शासनाकडून आरटीई प्रतिपूर्ती होत नाही. यामुळे संस्था चालक अडचणीत सापडले आहे. जर शासनाकडून परतावा मिळत नसेल तर ॲडमिशन आम्ही का द्यावे असा, सवाल आरटीई फाउंडेशनच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. तसेच लवकरात लवकर परतावा न मिळाल्यास उपोषण करण्‍यात येईल, असाही इशारा देण्‍यात आला आहे.