शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अवयवदानासाठी जळगाव जिल्ह्यात 200 जणांचा संकल्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 12:55 IST

प्रतिसाद : जिल्ह्यात 800 ठिकाणी झाल्या ग्रामसभा, विद्याथ्र्याचाही पुढाकार

ठळक मुद्देविद्यापीठात 350 विद्याथ्र्यानी घेतली अवदानाची प्रतिज्ञा20 ते 25 हजार अर्ज भरण्याचा संकल्प800 ग्रामसभा घेण्यात आल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30 -  अवयवदानाविषयी जनजागृती होण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय महा अवयवदान अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 29 रोजी 800 ठिकाणी ग्रामसभा झाल्या. यासाठी 150 ते 200 जणांनी अर्ज भरून दिल्याचे सांगण्यात आले. शहरांसोबतच गाव पातळीवर अवयवदानाची मोहीम राबविण्यासाठी 29 व 30 ऑगस्ट रोजी अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी विशेष ग्रामसभा घेतल्या जात असून जळगाव जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 29 रोजी जवळपास 800 ग्रामसभा घेण्यात आल्या. या सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कर्मचा:यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर. पाटील यांनी रावेर तालुक्यात शाळेमध्ये जाऊन या विषयी मार्गदर्शन केले.  अवयवदानासाठी इच्छुक व्यक्तींकडून अजर्देखील भरून घेतले जात असून यामध्ये जिल्ह्यात पहिल्या दिवशी 150 ते 200 अर्ज भरले गेल्याची माहिती डॉ. बी.आर. पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आशा सेविकांची यात मदत घेतली जात असून आता एकेका आशा सेविकेकडून  प्रत्येकी 10 अर्ज भरुन घेण्याचे नियोजन असल्याचेही डॉ. पाटील म्हणाले. यातून किमान 20 ते 25 हजार अर्ज भरुन घेण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. किमान 800 ग्रामसभा व 200 अर्ज भरल्या गेल्याचा अंदाज डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. यामध्ये एकटय़ा अमळनेर तालुक्यात तब्बल 125 ग्रामसभा झाल्या. राज्यात जळगाव अव्वल ठरविण्याचा प्रयत्न- डॉ. एन.एस. चव्हाणदेशभरात अवयवदानाच्या चळवळीला प्रतिसाद वाढत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात हे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यात जास्तीत अवयवदानाची संख्या वाढवून जिल्हा राज्यात अव्वल करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. अवयव दानाच्या चळवळीचे स्वरुप वाढत असून जळगाव जिल्ह्यात ही सुविधा नसली तरी यासाठी अद्यायावत रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. चव्हाण म्हणाले. ही चळवळ वाढत असल्याने अवयवदानाची सुविधा नसल्याची अडचण आताच निर्माण झाली आहे. त्यामुळे यावरही मात केली जाईल.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवारी अवयवदान जनजागृती अभियानाअंतर्गत 350 विद्याथ्र्यानी अवदानाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी  आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.पी.पी.पाटील यांनी अवयदात्यांची सूची करण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल असे सांगितले. तर दत्तात्रय कराळे यांनी अवयवदानामुळे मृत्यू नंतरही आपण हे जग पाहू शकतो, असे सांगितले.