शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी 20 टेबल व 60 कर्मचारी

By admin | Updated: February 21, 2017 00:15 IST

4 तासात निकाल : ‘नूतन मराठा’तील सभागृहात क्रीडा संकुलाकडून असणार प्रवेश

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नूतन मराठा महाविद्यालयातील सभागृहामध्ये 20 टेबल लावले जाणार आहेत. एका टेबलवर 3 कर्मचारी असतील. एकूण 60 कर्मचारी मतमोजणीच्या कामात व्यस्त असतील. जि.प.साठी 10, तर पं.स.साठी 10 स्वतंत्र टेबल असतील. एकाच वेळी सर्व गटांचे निकाल जाहीर होतील. कुठलीही घोषणा केली जाणार नाही. चार तासात सर्व निकाल लागतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सकाळी 10 पासून सुरुवातमतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तत्पूर्वी 9.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये नूतन मराठा महाविद्यालयातील स्ट्राँग रूम उघडली जाईल. सर्व इव्हीएमबाबत खात्री केल्यानंतर मतमोजणी सुरू होईल. जि.प.साठी दोन प्रतिनिधी, पं.स.साठी एकालाच परवानगीजि.प.चे उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी दोन प्रतिनिधी (काउंटींग एजंट) पाठवू शकतील. तर पं.स. उमेदवारांना एकच प्रतिनिधी पाठविता येईल. याशिवाय स्वत: उमेदवार मतमोजणीच्या स्थळी उपस्थित राहू शकतील. इतरांना मतमोजणीस्थळी प्रवेश मिळणार नाही. मतमोजणी प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्र निवडणूक शाखेतर्फे दिले जात आहेत. एका टेबलवर 18 इव्हीएम मतमोजणीसाठी एका टेबलवर एकूण 18 इव्हीएम येतील, असे अपेक्षित आहे. कर्मचारी व काउंटींग एजंट यांना मदतीसाठी परिचरांची नियुक्तीही टेबलनिहाय केली जाणार आहे. मतमोजणीस्थळी पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी असतील. यासोबत चार निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी असा      ताफा असेल. मतमोजणी केंद्राच्या चारही बाजूला बंदोबस्त असेल.   मुख्य द्वारावर अधिकारी नियुक्त असतील. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना बंदोबस्तासंबंधी पत्र दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शर्मा यांनी दिली. नूतन मराठा महाविद्यालयाचे कोर्ट किंवा हौसिंग सोसायटीच्या भागातील दोन्ही मुख्य प्रवेशद्वार बंद असतील. महाविद्यालयाच्या मागच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या भागातील द्वाराने उमेदवार, अधिकारी, पत्रकार आदींना प्रवेश दिला जाईल. यामुळे जिल्हा क्रीडा संकुल ते डॉ.सुभाष चौधरी यांचे हॉस्पिटल (रिंग रोडकडे जाणारा रस्ता) हा रस्ता सकाळी 10 ते मतमोजणी पूर्ण होईर्पयत बंद राहणार आहे.  मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दलास पत्र दिले आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी व नंतरही उमेदवारांच्या प्रतिनिधी, समर्थकांचे सहकार्य अपेक्षित आहे.     -जलज शर्मा,            निवडणूक निर्णय अधिकारी