शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

खान्देशात 20 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By admin | Updated: June 26, 2017 16:04 IST

काही ठिकाणी ‘महावितरण’च्या हलगर्जीपणाचे बळी

ऑनलाईन लोकमत/किशोर पाटील

जळगाव, दि.26 - पावसाळ्यात विजेमुळे होणा:या अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आह़े गेल्या 22 दिवसात खान्देशात वीजेचा धक्क्यामुळे 20 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यात एक बालक व दोन महिलांचा समावेश आहे.
पावसाळ्यात विजेचा प्रवाह जास्त असतो़ घरातील अर्थिग सुस्थितीत असल्यास त्यामुळे अपघाताचा धोका कमी असतो़ अर्थिग नसल्याने विजेचा धोरदार धक्का बसून जीव जाण्याची शक्यता असत़े यामुळे महावितरणच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना अपघात टाळण्यासाठी दक्षता घेण्याबाबत तसेच प्रतिबंधक उपायोजनाबाबत माहिती देण्यात येते. मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आह़े़ तर काही घटनांमध्ये वीजचोरीही जीवावर बेतत आह़े  
अपघाताची प्रमुख कारणे  
घरात पाण्याचे विद्युत मोटारीला स्पर्श,  कपडे वाळत घालण्यासाठी वीज खांबास वा विद्युत प्रवाहित होईल अशा ठिकाणी बांधलेली विद्युत संवाहक तार , घरातील लोखंडी खिडकी, दरवाजा, ग्रिल (जाळी) तसेच फ्रिज, कुलर, मिक्सर, इस्त्री, गिझर, पाण्याची मोटार आदी विद्युत उपकरणांमध्ये विद्युत प्रवाह उतरून स्पर्श झाल्याने, विद्युत खांब वा स्टे वायरला स्पर्श, शेतात ओल्या हाताने पंप सुरु करताना, शेतातील कृषी पंपात अर्थिगमध्ये वीजप्रवाह उतरल्याने स्पर्श होवून, वीजतारांवर आकडा टाकताना, ही अपघाताची प्रमुख व वारंवार दिसून येणारी कारणे आहेत. लोंबळणा:या तारांबाबत उपायायोजना केल्या जात नसल्याने त्यामुळे दुर्घटनांना सामोरे जावे लागत आह़े
दोन लाखांवरून आता चार लाख रूपये आर्थिक मदत 
विजेच्या धक्का लागून मृत्यू झालेल्या घटनाचा विद्युत निरिक्षकांमार्फत संबंधित प्रकरणाचा अहवाल तयार करण्यात येतो़ विद्युत निरिक्षकाच्या अहवालात जर महावितरण विभागाची चूक असल्याचे निदर्शनास आले, तर मयताच्या वारसास आर्थिक मदत करण्यात येत़े गेल्या वर्षार्पयत दोन लाख रूपये मदत दिली जात होती़ जानेवारी 2017 पासून मदतीत वाढ झाली आह़े आता मयताच्या वारसास चार लाख रूपयांर्पयत मदत देण्यात येत असल्याची माहिती महावितरण जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली़
 महावितरणच्या उदासीन कारभाराचे दोन बळी
 किशोर हरी बाविस्कर (30)आणि संदिप हिलाल बाविस्कर (28) दोन्ही रा. गोरगावले (चोपडा) या जळगाव तालुक्यातील भोलाणे (जळगाव) येथील शौच खडडयाचे काम करत होत़े यादरम्यान खोदकाम पूर्ण झाल्याची लोखंडी पाईपाच्या सहाय्याने खात्री करताना विद्युत तारांना पाईपाच्या स्पर्श झाल्याने किशोर बाविस्करला जोरदार वीजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला होता तर संदीप बाविस्कर हा जखमी झाला होता़ 
पाचोरा तालुक्यातील चुंचाळे येथे दुचाकीवरून घराकडे परतत असताना अंगावर वीजतारा कोसळल्याने उमेश रामकिसन झंवर (वय 47, रा़ बाळद ता़) यांचा मृत्यू झाला होता़ 
अनेक ठिकाणी जीर्ण तसेच लोंबकळणा:या तारा आहेत़ याबाबत महावितरणकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आह़े त्याकडे महावितरण लक्ष देणे गरजेचे आह़े
 
महावितरणकडून वेळावेळी दुरूस्तीची कामे केली जात असतात़ मात्र जोरदार वादळामुळे विद्युत खांब कोसळतात़,तारा तुटतात व दुर्देवी घटनांमध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यू होतो़ नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 - दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता़