शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भर थंडीत मानाचा 'सरपंच चषक' पटविण्यासाठी साकेगावातील २४ संघातील ३६० खेळाडूंचा कसून सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 15:46 IST

ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक सीजन-६’साठी गावातील २४ संघातील ३६० खेळाडू मानाचा सरपंच पटकविण्यासाठी भर थंडीत कसून सराव करीत असून, विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक संघ प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देजिंकणाऱ्या संघास ३३  हजारद्वितीय संघास १० हजारांचे रोख बक्षीसवर्षभर राहणार विजेत्या संघाचा ग्रामपंचायत कार्यालयात फोटो

भुसावळ, जि.जळगाव : ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना, टेनिस क्रिकेट संघटना आयोजित ‘सरपंच चषक सीजन-६’साठी गावातील २४ संघातील ३६० खेळाडू मानाचा सरपंच पटकविण्यासाठी भर थंडीत कसून सराव करीत असून, विजेत्या संघाचा वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक संघ प्रयत्न करीत आहे.गावातील खेळाडूंचे आरोग्य सुदृढ सुप्त गुणांना वाव मिळावे, निरामय आरोग्य राहावे, व्यसनापासून दूर राहून मैदानाची आवड निर्माण व्हावी, गावाचा नावलौकिक व्हावा, खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळावी याकरिता ग्रामपंचायत साकेगाव, जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षांपासून यशस्वी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.गावाचा उत्सव, सुट्टी रजा टाकून येतात देशभरातून चाहतेसरपंच चषक गावातील खेळाडूंसाठी पर्वणी असते. यात सहभाग घेण्यासाठी शासकीय व निमशासकीय सेवेत देशातील ठिकठिकाणी नोकरीसाठी गेलेले पोलीस, अभियंते, रेल्वे कर्मचारी, मक्तेदार हे गावात रजा टाकून स्पर्धेत सहभाग घेतात व साकेगाव सरपंच चषक उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.मैदान सज्जराष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ‘सरपंच चषक’साठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैदानाचे सपाटीकरण व विशेष मातीची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या मैदानावर मानाचा सरपंच चषक पटवण्यासाठी खेळाडू सकाळ-दुपार-संध्याकाळ सराव करून घाम गाळात आहेत.विजेत्या व उपविजेत्या संघास रोख बक्षीससरपंच चषक स्पर्धेत विजेत्या संघास ग्रामपंचायत प्रशासनातर्फे २५ हजार, माजी सरपंच आनंद ठाकरे यांच्याकडून पाच, डॉ.दीपक पाटील यांच्याकडून तीन हजार सर्व मिळून ३३ हजारांचे तर उपविजेत्या संघास जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेतर्फे पाच पप्पू पटेल यांच्यातर्फे पाच असे १० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.विजेता संघाचा वर्षभर ग्रामपंचायत कार्यालयात फोटोस्पर्धेतील विजेत्या संघाची डीजेच्या तालावर गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. तसेच विजेत्या संघाचा मान म्हणून वर्षभरासाठी ग्रामपंचायत कार्यालयात फोटो लावण्यात येतो. परिणामी सर्वच संघ कसून सराव करीत आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhusawalभुसावळ