शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चिंचगव्हाण येथे २लाखाचे बनावट खत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:53 IST

कृषि विभागाची कारवाई : तिघांविरुद्ध गुन्हा

मेहुणबारे, ता. चाळीसगाव- तालुक्यातील चिंचगव्हाण येथे एका कृषी केंद्र चालकाकडे ठेवलेले सुमारे २ लाख १० हजार रुपए किंमतीच्या बनावट युरिया खताच्या २०० गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचगव्हाण येथे गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा खताचा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हा कृषी विभागाला मिळाली. यानुसार जिल्हा कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरूण तायडे यांनी चाळीसगाव येथे धाव घेऊन तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव, कृषी सहाय्यक टी. टी. पवार, टी. डी. खोत, मेहूणबारे पोलीस ठाण्याचे हवालदार गोपाल पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी १० वाजता छापा टाकला असता युरिया खताच्या सुमारे २०० गोण्या आढळल्या. हे खत बनावट असल्याचे आढळून आले. कृषी विभागाच्या पथकाने हे खत जप्त करून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर हे खत एका ट्रॅ्क्टरद्वारे मेहूणबारे पोलीस स्टेशनला आणले. चिंचगव्हाण शिवारात कृषी विभागाने बनावट खताचा साठा जप्त केल्याची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पथकाने त्याची विचारपूस केली असता हा माल चाळीसगाव येथील महावीर कृषी केंद्राचे संचालक शैलेश साखरचंद छाजेड याच्याकडून विकत घेऊन विक्रीसाठी आणल्याची माहिती कृषी केंद्राचा संचालक प्रविण निकम याने कृषी विभागाच्या पथकाला चौकशीत दिली. याप्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मेहूणबारे पोलीस स्टेशनला बनावट खत बाळगून फसवणूक केल्याप्रकरणी रूपेश कृषी केंद्राचा संचालक प्रविण काशिनाथ निकम याच्यासह महावीर कृषी केंद्राचा संचालक शैलेश साखरचंद छाजेड, काशिनाथ वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.