शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

184 खुले भूखंड ताब्यात घेणार

By admin | Updated: January 7, 2017 00:42 IST

निर्णय : मनपा प्रशासनातर्फे महासभेत चर्चेसाठी येणार विषय

जळगाव : तत्कालीन नगरपालिकेने तसेच मनपाने खाजगी स्वयंसेवी संस्थांना सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांसाठी तसेच विकसित करण्यासाठी दिलेल्या ओपनस्पेसचा गैरवापर होत असल्याने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या जागांवर त्या ले-आऊटमधील नागरिकांचा अधिकार असल्याने या जागा परत ताब्यात घेण्याचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यातील संबंधीत संस्थांना दिलेल्या परंतू त्यांनी विकसित न केलेले खुले भूखंड (ओपनस्पेस) ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनातर्फे येत्या महासभेत सादर करण्यात येणार आहे. 397 खुल्या भूखंडांची खिरापतनगररचना विभागाकडून ले-आऊट मंजूर करताना त्या ले-आऊटमधील नागरिकांना हवा खेळती रहावी, मुलांना खेळण्यासाठी जागा असावी तसेच काही उपक्रम राबविता यावे, या उद्देशाने खुले भूखंड सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या भुखंडांवर अतिक्रमण होऊ नये म्हणून त्याला मालकी म्हणून मनपाचे नाव लावले जाते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ओपनस्पेसचा वापर त्या संबंधीत     ले-आऊटमधील नागरिकांसाठीच व्हायला हवा. त्यावर इतर बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तत्कालीन नपा व मनपाने                 शहरातील सुमारे 397 ओपनस्पेस विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वयंसेवी संस्थांना कराराने दिल्या. अनेक वर्षात विकास नाहीचत्यापैकी 184 ओपनस्पेस संबंधीत संस्थांनी अनेक वर्षापासून ताब्यात मिळूनही विकसितच केलेल्या नाहीत. त्यामुळे आधी त्या 184 ओपनस्पेस मनपाने ताब्यात   घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत सादर करण्यात येणार  आहे.