शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

१८ लाखात शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 21:37 IST

केळी उत्पादकाकडून केळी खरेदी करण्याचा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना नसतांना सावदा येथील राजलक्ष्मी केला

यावल : केळी उत्पादकाकडून केळी खरेदी करण्याचा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना नसतांना सावदा येथील राजलक्ष्मी केला एजन्सीचे संचालक बाळू पुंडलिक साळी व कोळवद येथील जयवंत प्रल्हाद या दोघांनी १० मार्च ते मे २०१६ या कालावधीत तालुक्यातील सातोद व कोळवद येथील सात केळी उत्पादकांकडील केळी खरेदि करून त्यांची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. शेतक-यांनी सर्व संबधिताकडे वारंवार पाठपुरावा केल्यांनतर येथील बाजार समीतीच्या वतीने दोघावर शेतक-यांच्या फसवणूकीसह विश्वासघाताचा गुन्हा नोंदविला आहे.यावल बाजार समितीचे सचिव स्वप्नील सानेवणे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सावदा येथील राजलक्ष्मी केला एजन्सीचे संचालक बाळू पुंडलिक साळी व कोळवद येथील जयवंत प्रल्हाद फिरके यांनी सातोद व कोळवद येथील सात शेतकऱ्यांकडून मार्च ते मे २०१६ या काळात सात केळी उत्पाकांकडील केळी खरेदी करून त्यांची १७ लाख ९९ हजार २२३ रुपयांची फसवणूक केली आहे. सातोद व कोळवद ही गावे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहेत. संबधित व्यापरी यांनी कोणताही परवाना नसतांना तालुक्यातील केळी उत्पादकांची फसवणूक केली आहे. विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर २०१६ रोजी संबधित व्यापाऱ्यास रजिस्टर पोष्टाने नोटीस जारी करण्यात आली होती शिवाय रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील व्यापरी असल्याने रावेर बाजार समितीतर्फेही दप्तर तपासणीस उपलब्ध्द करून देण्याचे लेखी कळविले होते मात्र संबधितांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यानुसार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४१७, ४२० सह ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक अहिरे व संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.