शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षीय मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:36 IST

मोबाईलवर बोलताना घेतला गळफास

ठळक मुद्देमोबाईलवर भांडण झाल्याचा संशय

जळगाव : मोबाईलवर बोलत असतानाच किर्ती पवन दुसाने (वय १७) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता मेहरुणमधील रामनगरात घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, किर्ती ही मेहरुणमधील श्रीराम कन्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी ती शाळेत गेलेली नव्हती. वडील पवन दुसाने व आई भारती दोन्ही जण कामावर गेलेले होते. त्यामुळे किर्ती व लहान भाऊ लोकेश असे दोघेच घरी होते.दोघांनी दीड वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर लोकेश बाहेर गल्लीत खेळायला निघून गेला. दुपारी अडीच वाजता तो घरी आला असता दरवाजाची कडी आतून बंद होती. खिडकीद्वारे डोकावून पाहिले असता किर्तीने गळफास घेतला होता.भावाने तोंडावर पाणी मारलेबहिणीने गळफास घेतल्याचे दृष्य पाहिल्यानंतर भाऊ लोकेश याने तिला आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने खिडकीतून हात टाकून कडी उघडली व स्वत:च तिला खाली उतरविले. त्यानंतर तोंडावर पाणी मारले, मात्र तिचा कोणतीच हालचाल होत नव्हती.त्याने तातडीने वडीलांना फोन करुन माहिती दिली. वडील व आई यांनी घरी येऊन शेजारच्या लोकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. यावेळी आई, वडील व भावाचा प्रचंड आक्रोश सुरु होता. वडील सोनार काम करतात तर आई कंपनीत कामाला जाते. भाऊ आठवीत शिक्षण घेत आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरु होता.मोबाईलवर भांडण झाल्याचा संशयकिर्ती याचे मोबाईलवर कोणाशी तरी बोलणे सुरु होते. त्यात तिचे भांडण झाले असावे. मोबाईलवर बोलत असताना घराचा दरवाजा बंद केल्याचे शेजारच्या लोकांनी पाहिले. मात्र ती आत्महत्या करेल अशी पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. मोबाईलवर बोलत असतानाच तिने गळफास घेतला. दरम्यान, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून किर्तीच्या आई, वडीलांना धीर दिला. उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, देविदास सुरदास यांनी पंचनामा केला.