शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१६२ शेतकऱ्यांचे तगाई बोझे कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST

अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे ...

अमळनेर : शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर असलेले तगाई बोझ्यांमुळे कर्ज आणि खरेदी विक्रीस येत असलेल्या अडचणी तगाई बोझे कमी केल्याने दूर झाल्या असून, तालुक्यात १६२ जणांचे बोझे कमी करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे, तर स्वतःचा पिकपेरा लावता येत असल्याने शेतकरी हायटेक झाला आहे.

सतत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, अडचणी दूर करण्यासाठी शासनाने स्वातंत्र्य दिनापासून शेतकऱ्यांना पीक पेरा लावण्याचे स्वातंत्र्य दिले, तर अनेक वर्षांपासून शासनाने तगाई कर्ज माफ करूनही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर चारा तगाई, बंडिंग तगाईसह बंद पडलेल्या संस्थांचे बोझे सात बारावर दिसत होते. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नव्हते, तर खरेदी-विक्री, तसेच अनुदान आदींसाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे हे बोझे करून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील संकटाचे बोझे हलके करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. याबाबत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता.

महसूल विभागातर्फे तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि तालुक्यातील आठही मंडळात तगाई बोझे कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १६२ बोझे कमी करण्यात आल्याने शेतकरी मुक्त झाले आहेत. अनेक वर्षांपासूनच्या अडचणी दूर झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे, ई-पीक पेरा लावण्यासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आपल्या तलाठी पथकासह ग्रामीण भागात ॲप मार्गदर्शन करणारे कॅम्प सुरू केले असून, १५४ गावांपैकी १४६ गावनमध्ये ॲप नोंदणी झाली. १,४०१ शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे, तर ४७५ शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून स्वतःचा पीक पेरा लावला आहे.

मंडळाधिकारी डी.एस.तारे, पी.एस. पाटील, व्ही.पी. पाटील, आय.एस. महाजन, तलाठी गणेश महाजन यांच्यासह इतर तलाठी हे कृषी विभाग कर्मचाऱ्यांचा संप असतानाही त्यांच्याशिवाय ग्रामीण भागात फिरून शेतकऱ्यांना ऑनलाइन पीक पेरा लावण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यात ८२ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रांपैकी ६९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड केली आहे. त्यात ४१ हजार ६८९ हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी झाली आहे.

स्वतः शेतात फोटो काढून पीक पेरा लावल्याने शेतकऱ्यांना धान्य विकताना, लाभ घेताना आता अडचणी येणार नाहीत.

210821\21jal_2_21082021_12.jpg

 बोजा निरंक झाल्यानंतर आंनदाने सातबारा उतारे दाखवताना शेतकरी (छाया :अंबिका फोटो)