शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या चौकशीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधून १५ हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पतीने जेवण केले की नाही याची विचारपूस करण्यासाठी आयसीयूमध्ये पाच ते सहा मिनिटांसाठी गेलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पतीने जेवण केले की नाही याची विचारपूस करण्यासाठी आयसीयूमध्ये पाच ते सहा मिनिटांसाठी गेलेल्या अलका मधुकर लोणे (रा.शेंदुर्णी) यांच्या पर्समधून पंधरा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी अश्विनी हॉस्पिटल येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी अलका लोणे या पती मधुकर लोणे व मुलगी युवती पाटील यांच्यासह वास्तव्यास आहेत. ५ मे रोजी पती मधुकर लोणे यांना उपचारार्थ जळगावातील शाहूनगरमधील अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले. नंतर ११ मे रोजी अलका यांनादेखील मुलगी युवती हिने अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तसेच मेडिकल बिलाकरिता साडेबारा हजार व जेवणाच्या डब्यासाठी अडीच हजार रुपये युवतीने आईला दिले होते. ते पैसे अलका यांनी पर्समध्ये ठेवले होते. दरम्यान, गुरुवारी (दि. १३) मे रोजी पती मधुकर यांनी जेवण केले की नाही, याची विचारपूस करण्यासाठी अलका या आयसीयू कक्षामध्ये गेल्या, तितक्यात त्यांच्या पर्समधील पंधरा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पाच ते सहा मिनिटानंतर त्या त्यांच्या जागेवर आल्या असता, त्यांना पर्समधील रोकड गायब झालेली दिसून आली. हा प्रकार त्यांनी लागलीच मुलगी युवती हिला सांगितला व डॉक्टरांनासुद्धा घटना कळविली. अखेर युवती पाटील यांनी गुरुवारी रात्री शहर पोलीस ठाण्‍यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.