शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील शिरसाड येथे विहिरीत तोल जाऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:19 IST

शिरसाड येथे गावालगतच्या शेतात ठिबक नळ्या लावताना विहिरीत तोल गेल्याने रवींद्र संजय अलकरी (राजपूत) या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना १२ रोजी सकाळी घडली.

ठळक मुद्देशेतात ठिबक नळ्या लावताना घडली घटनाडोक्याला जबर मार लागल्याने त्याचा विहिरीतच दुर्दैवी अंत

साकळी, ता.यावल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या शिरसाड येथे गावालगतच्या शेतात ठिबक नळ्या लावताना विहिरीत तोल गेल्याने रवींद्र संजय अलकरी (राजपूत) या १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना १२ रोजी सकाळी घडली.सूत्रांनुसार, शिरसाड येथील गावालगत वासुदेव सोमा टेकडे (रा.भालोद) यांच्या शेतामध्ये १२ रोजी सकाळी साडेआठचया दरम्यान मजुरांकडून ठिबक नळ्या लावण्याचे काम चालू होते. यावेळी रवींद्र संजय अलकरी (राजपूत) (वय-१५) याच्यासह सागर बारेला रा.बोरावल व करण भिलाला रा.बनूर, मध्य प्रदेश या दोघा मजुरांसोबत शेतात ठिबक नळ्या लावण्याचे काम करीत होता. नळ्या ओढण्याचे काम करीत असताना रवींद्र जवळच असलेल्या विहिरीत एकदम तोल जाऊन पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा विहिरीतच दुर्दैवी अंत झाला. त्याचा पायही मोडला गेलेला होता.या घटनेची वार्ता कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत उतरणाऱ्यांच्या मदतीने मयत रवींद्रचे शव विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन केले. उशिरापर्यंत यावल पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अचानक घडलेल्या घटनेने गावपरिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.रवींद्रच्या पश्चात आई, वडील, दोन मोठ्या बहिणी, एक लहान भाऊ असा परिवार आहे. तो शालेय शिक्षण घेत होता. त्याचा घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून आई-वडील शेतमजुरी करतात.