शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

महूखेडा येथे 15 जणांना डायरीयाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:41 IST

दूषित पाणी पुरवठा : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ; मंत्री महाजन यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळेच्या परिसरात व इतर ठिकाणी घाण साचली आहे. गावात ठिकठिकाणी उकिरडे पडलेले असून ग्रामपंचायतीतर्फे साफसफाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.गारखेडा प्राथमिकआरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने तत्काळ पाहणी करुन रुग्णांना उपचार व आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

ऑनलाईन लोकमतजामनेर,दि.2 - तालुक्यातील महुखेडा येथे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावात 15 जणांना डायरीयाची लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत केलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष होत आहे.      मुंदखेडे हे गाव गारखेडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी गावांत येवून रुग्णांची प्राथमिक तपासणी करीत रुग्णांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीला दूषित पाणी पुरवठा थांबविण्याबाबत पत्र देण्यात आले. मात्र ग्रा.पं. पदाधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे.गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्यपंचायत समिती व आरोग्य विभागाने दखल न घेतल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने गावात भेट देवून पाहणी केली असता सर्वत्र घाणीचे साम्राज्य आढळून आले. नवीन प्लॉट भागात तसेच सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याची स्थिती होती. गावाजवळ महुखेडा धरण आहे. या ठिकाणी मुबलक पाणी साठा आहे.  मात्र मंजुर झालेली भारत निर्माण योजना ठेकेदाराने पुर्ण न केल्याने  ग्रामस्थांना बोरींगचे पाणी प्यावे लागत आहे.

गावात सर्वत्र अस्वच्छता असल्याने दरुगधी आहे. दूषित पाणी पुरवठय़ामुळे गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने लक्ष द्यावे.                           - लक्ष्मण गायकवाड, ग्रामस्थ.

 मंत्री गिरीष महाजन यांनी सूचना देवून देखील ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. गावात नियमित साफसफाई होत नसल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.                             -विजय पाटील, ग्रामस्थ.

गावात जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छतेला सुरुवात केली आहे. रुग्णांवर उपचार सुरु असुन नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे.                             -उषा मानसिंग पवार, सरपंच, महुखेडा