शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

14 व्या वित्त आयोग निधी खर्चाबाबत बंधनामुळे ग्रामपंचायतीसमोर अडचणी

By admin | Updated: May 25, 2017 15:40 IST

शासनाने जखडले ग्रामपंचायतींचे हात जनता सुविधांपासून वंचित

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, दि.25 - शासनाच्या पुढील आदेशाशिवाय चौदाव्या वित्त आयोगाचा पैसे खर्च करू नये या आदेशामुळे ग्रामपंचायतींचे हात बांधले गेले असून भर उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारण्यासाठी काहीच करता येत नाही. शासनच जनतेच्या हाल अपेष्टे साठी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा मंगरुळचे सरपंच अनिल अंबर पाटील यांनी केला आहे
     आमचा गाव आमचा विकास आराखडा योजनेंतर्गत शासनाने पुढील चार वषार्चा 2016 ते 2020 असा ग्रामपंचायतींच्या कामांचा आराखडा तयार करीत त्यांना ग्रामसेवक, अभियंता , गटविकास अधिकारी यांच्या समितिने मंजूर करून फेब्रुवारी पासून 14 व्या वित्त आयोगाचे 2 हफ्ते ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा झाले आहेत. या निधीतून अपूर्ण कामे, देखभाल दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण , उपजीविका, महिला बालकल्याण, मागासवर्गीय विकास, पाणी टंचाई, पाणी पुरवठाही वीज बिल भरणे आदी कामे करता येत होती. यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण व शिवार फेरी झाली. 
सर्व साधारण पणे एक एक गावाला  9 ते 10 लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. मात्र शासनाने पुढील आदेश येईपयर्ंत 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करू नये असे निर्देश दिल्याने ग्रामपंचायतींचे हात बांधले गेले आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत हतबल ठरत आहेत. 73 व्या घटना दुरुस्ती नुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचे धोरण असताना मात्र शासन असे अडथळे निर्माण करून ग्रामपंचायती खिळखिळ्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामसेवक आणि पंचायत समित्या शासन आदेशाला बांधील असल्याने पैसे उपलब्ध असूनही जनता सुविधांपासून वंचित राहत आहे. नंतर परवानगी आल्यास मार्च पयर्ंतच्या मुदतीत कामे पूर्ण करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शासन स्तरावरून 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची परवानगी आणून ग्रामपंचायती स्वावलंबी करावे अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.