शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

वर्षभरात आढळले 140 क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:25 IST

अमळनेर : संसर्गजन्य असला तरी औषधोपचाराने क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकतो

धार, ता.अमळनेर : क्षयरोग म्हटला म्हणजे अनेकांना त्याची भीती वाटते. आपल्याकडे क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. देशात दररोज क्षयरोगाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अमळनेर तालुक्यात वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासणी केली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले आहेत. दरम्यान, हा आजार संसर्गजन्य असला तरी तो पूर्णत: बरा होतो, असे ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधिका:यांनी सांगितले.क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम टय़ुबरक्युलेसिस’ नावाच्या जिवाणूपासून होत असतो. प्राचीन काळी याला ‘राजयक्ष्मा’ नावाने ओळखले जायचे.  क्षयरोग फुफ्फुसांना होत असला तरी तो शरीराच्या लसिकाग्रंथी, मेंदू, हाडे, मूत्रपिंड, यासारख्या अवयवांनाही होऊ शकतो. क्षयरोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. जेव्हा फुफ्फुसाच्या क्षयरोगाने आजारी असणारी व्यक्ती शिंकते, खोकते तेव्हा हवेद्वारे क्षयरोगाच्या जिवाणूचा प्रसार होतो.अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आरएनटीसीपी सेंटर असून, यामार्फतही उपचार केले जातात. येथील प्रयोगशाळेत ‘एलईडी फ्लोरोसन्स’     हे अत्याधुनिक यंत्र आणण्यात आलेले आहे. या यंत्राद्वारे रुग्णाची थुंकी तपासली जाते. नवीन टेक्नॉलॉजी असल्याने पूर्वीपेक्षा 10 पटीने रिझल्ट चांगले मिळतात. क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू याद्वारे स्पष्ट दिसतात. गेल्या वर्षभरात 1326 जणांची थुंकी तपासण्यात आली. त्यात 140 जण क्षयरोगी आढळून आले. क्षयरोगींची ग्रामीण रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार करण्यात येत असतो, असे  प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप अहिरराव व क्षयरोग आरोग्य भेटीदाता रमाकांत सैंदाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.                    क्षयरोग संसर्गजन्य असला तरी, औषधोपचाराने हा आजार पूर्णत: बरा होतो. समतोल आहार, योग्य व्यायाम व पुरेशी विश्रांती याचा अंगीकार केल्यास रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. क्षयरुग्णास क्षयरोगमुक्त करणे हे आमचे ध्येय आहे.                         -डॉ. प्रकाश ताळे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय,