शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:02 IST

- विभागीय आयुक्त राजाराम माने

ठळक मुद्देनेण्या आणण्याच्या व्यवस्थेचे आदेश

जळगाव : जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विशेष दर्जा देण्यात आला असून १४ हजार १६३ मतदारांना नेण्या-आणण्याची व्यवस्था व निवासाची व्यवस्था करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी शनिवारी येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) उन्मेष महाजन आदी उपस्थित होते.‘पूर्वपीठिका’ चे प्रकाशनजिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या लोकसभा निवडणूक पूर्वपीठीका-२०१९ चे प्रकाशन राजाराम माने यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.नवमतदारांची घेतली माहितीमाने यांनी जिल्ह्यात नवमतदार वाढण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.३१२ शस्त्रे केली जमाजिल्ह्यात चोपडा तालुक्यात्त पाच तर रावेर तालुक्यात सहा मतदान केंद्रावर मोबाईल नेटवर्क नसल्याने त्याठिकाणी पोलीस वॉकीटॉकीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात ५५५ व्यक्तींकडून त्यांची शस्त्रे जमा करण्यात येणार असून आतापर्यंत ३१२ शस्त्र जमा झाली असून उर्वरित शस्त्रे लवकरात लवकर जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ईव्हीएम स्ट्राँग रुम सिलींग व सेटींगच्या कार्यवाहीबाबतची माहिती देण्यात आली.दिव्यांग मतदारांना विशेष दर्जाभारत निवडणूक आयोगाने या निवडणूकीपासून दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात १४ हजार १६३ दिव्यांग मतदार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे. यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या प्रकारचे दिव्यांग असलेल्या किती व्यक्ती आहे. याची सविस्तर माहिती संबंधितांनी तयार करुन ठेवावी. त्यानुसार त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्था करणे, त्यांना सहाय्यकाची आवश्यकता भासणार असल्यास तशी माहिती संकलीत करणे, त्यांना मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, मदत कक्ष निर्माण करणे, एकाच मतदान केद्रावर अधिका दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांना आणण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करणे, त्यांचेसाठी मतदान केंद्रावर निवासाची व्यवस्था करण्याच्याही सूचना दिल्या.