शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाच ऐवजी सहा फुटांची गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक असणार, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
2
साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार?
3
मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...
4
भाग्यवान! संपूर्ण आयुष्य गरिबीत काढलं, आता फळफळलं नशीब; रातोरात 'असा' झाला करोडपती
5
११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन
6
भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी
7
कोणाला हवा सोनम-राजचा जामीन?, राजा रघुवंशी हत्याकांडात नवा ट्विस्ट; ४० लाखाबाबत खुलासा
8
निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी घेरलं; संसद भवनात 'जय महाराष्ट्र'ची घोषणा, लॉबीत काय घडलं?
9
'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?
10
१ कोटी कॅश, ७९ ATM कार्ड, ३० मोबाईल...; ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, १६ जणांना अटक
11
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे
12
चॉकलेट, कार, व्हिस्की...; FTA करारानंतर स्वस्त होणार 'या' वस्तू; पण इंग्लंडला काय फायदा होणार?
13
कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर
14
Janhvi Kapoor : कल्याणमधील तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ बघून संतापली जान्हवी कपूर, म्हणाली....
15
Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!
16
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
17
हृदयद्रावक! वडिलांना चहा देऊन गेली अन्...; मासिक पाळीचा त्रास असह्य, मुलीने संपवलं आयुष्य
18
ऑनलाईन रमीच्या नादात शिक्षिका चोर बनली,बुरखा घालून ८ लाखांवर डल्ला मारला; चेहऱ्यावरील तीळामुळे सापडली
19
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
20
‘ती’ मुलगी घरातच ठरली असुरक्षित; वडील, भावांसह चौघांचा ११ महिने लैंगिक अत्याचार

14 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो!

By admin | Updated: September 25, 2015 00:14 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. 37 लघु व तीन मध्यम प्रकल्पांसह प्रकाशा बॅरेजमध्ये 76 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा नोंदला गेला आहे. शिवाय 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून पाच प्रकल्पांमध्ये 90 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. यामुळे रब्बी हंगामात शेतक:यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. दरम्यान, नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणा:या वीरचक प्रकल्पातील पाणीसाठा 36 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यंदा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना आणि सप्टेंबर मध्यावर असतानाही पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सर्वत्र पाण्याचे संकट निर्माण झाले होते. अवघा 58 टक्के पाऊस झाला होता. तोदेखील अनियमित होता. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा तळाला गेला होता. अनेक प्रकल्पांमध्ये ठणठणाट होता. परंतु वरुणराजाची कृपा झाली आहे. अक्षरश: धो-धो पाऊस बरसला. मागची सर्व कसर या पावसाने काढून टाकली. त्याचा परिणाम सहाजिकच प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यात झाला. एक, दोन नव्हे तब्बल 14 प्रकल्प ओसंडून वाहू लागले. नंदुरबारला ज्या प्रकल्पांचा पाण्याचा आधार आहे तो आंबेबारा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. वीरचकमधील पाणीपातळी थेट 25 टक्क्यांनी वाढली, तर खोलघर धरणदेखील ओव्हरफ्लो झाले आहे.

20 टक्के जादा

सप्टेंबरच्या तिस:या आठवडय़ात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रकल्पांमधील पाणीसाठा तब्बल 20 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी 23 सप्टेंबर्पयत पाणीसाठय़ाची टक्केवारी 58 टक्के होती. यंदा ती 76.5 टक्के आहे. 37 लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी 69 टक्के, तर यंदा 76.91 टक्के पाणीसाठा आहे. शिवाय गेल्या वर्षाच्या तुलनेत ओव्हरफ्लो झालेल्या प्रकल्पांची संख्यादेखील यंदा जादा आहे. गेल्या वर्षी 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, तर यंदा 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची परिस्थिती समाधानकारकच म्हणावी लागेल.

मध्यम प्रकल्प

जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी रंगावली प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात देखील 100 टक्के तर नंदुरबार तालुक्यातील शिवण प्रकल्पात 37.43 टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय प्रकाशा बॅरेजमध्येदेखील पाणी अडविल्याने 83 टक्के पाणीसाठा झाला आहे.

शहरवासीयांना दिलासा

नंदुरबारला पाणीपुरवठा करणा:या वीरचक प्रकल्पात नऊ टक्क्यांवरून 37.43 टक्के पाणीसाठा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय शहरासाठी 50 टक्के पाणीसाठा राखीव असलेला आंबेबारा प्रकल्पदेखील ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लो झालेले पाणी वीरचक प्रकल्पात येते, तो खोलघर प्रकल्प देखील ओसंडून वाहत आहे. त्यामुळे येत्या काळात पाऊस झाला, तर वीरचकची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर्पयत वीरचक प्रकल्पात 54 टक्के पाणीसाठा होता. यंदा 37.43 टक्क्यांर्पयत आहे.

पाणी सोडू नये

शासनाचे पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे अनेक राज्यातील अनेक प्रकल्पातील पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्याच मुद्यावर नंदुरबारला पाणीपुरवठा करणा:या वीरचक प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठादेखील आरक्षित करणे आवश्यक आहे. जोर्पयत प्रकल्प पूर्ण 100 टक्के भरला जात नाही, तोर्पयत या प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग करू नये, अशी मागणी होत आहे. त्या दृष्टीने पालिकेनेही शासन व प्रशासनाकडे प्रयत्न चालविले आहेत. तसे झाल्यास उपलब्ध पाणीसाठा सध्याच्या पाणीपुरवठय़ाच्या नियोजनानुसार किमान मे महिन्यार्पयत पुरेल असा अंदाज आहे.

तरीही पाणी जपून वापरावे

पाण्याचे संकट टळले असले तरी शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. सध्या एक दिवसाआड अर्धातास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापुढेही ही वेळमर्यादा कायम राहणार आहे. नागरिकांनी नळांना तोटय़ा लावाव्या, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पावसाने वेळीच हजेरी लावल्याने दोन्ही प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे शुक्रवारी पालिकेत पूजेचे देखील आयोजन केले आहे. शहरवासीयांना आमंत्रीत देखील करण्यात आले आहे.

भूगर्भातील पातळीला फायदा

भूगर्भातील पाणी पातळीला या पाणीसाठय़ामुळे फायदा होणार आहे. गेल्या वर्षी कमी पजर्न्यमान आणि दुष्काळी स्थिती यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठय़ांमुळे पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.