शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अहिराणी भाषेतील १४ ज्येष्ठ साहित्यिकांना' साहित्यिक गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:01 IST

हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेला ऑनलाईन झाला.

अमळनेर : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित, जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त अहिराणी भाषेतील ज्येष्ठ १४ साहित्यिकांनासाहित्यिक 'गुरू गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.२३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाईन झालेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्रज्ञ डॉ.आरती सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्ष नेते नामदेव ढाके होते.यावेळी समारंभाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी खान्देशी माणसाचे गुणगाण सांगितले की, खान्देशी माणूस जिद्दी व कामाच्या चिकाटीमुळे प्रत्येक मोठ्या शहरात वसला आहे, असे सांगत अहिरानी भाषा लुप्त होऊ नये म्हणून येणाऱ्या पिढ्यांनाही अहिरानीचे धडे देण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवडचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी व आयुक्त राजेश पाटील यांनी पुण्यात खान्देश भवन निर्मितीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासीत केले. यावेळी ए.जी.पाटील, डॉ.आरती सूर्यवंशी, बापूसाहेब हटकर, प्रा.सदाशिवराव माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.पुरस्कार्थि असे-प्राचार्य सदाशिवराव माळी, कृष्णा आनंदा पाटील, सुभाष अहिरे, डॉ.उषा सावंत, विमल वाणी, सुरेश आर.पवार, रामदास वाघ, बापूसाहेब देवीदास हटकर, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. सुधीर देवरे, प्रकाश पाटील, पिंगळवाडेकर, शकुंतला पाटील, रोटवदकर, नारायण हरी महाजन, रत्ना पाटील या साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सन्मान सोहळ्याचा उद्देश उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केला. मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय अहिरानी परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सन्मान पत्राचे वाचन वर्षा पाटील व एम.के भामरे यांनी केले. ऑनलाईन कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी भिला पाटील व प्रशांत पाटील यांनी सांभाळल्या.सूत्रसंचालन बापूसाहेब पिंगळे व प्रा.प्रकाश माळी यांनी, तर पी.झेड.कुवर यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर