शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

14 कोटींच्या रस्ते कामांना आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’

By admin | Updated: January 7, 2017 00:52 IST

विकास कामांना फटका : नागरिकांच्या अडचणीत भर पडणार

जळगाव : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेचा मनपाच्या प्रस्तावित विकास कामांना फटका बसला आहे. मनपाने 10 कोटीच्या निधीतून रस्ते व गटारींचे काम तसेच 3.75 कोटींच्या रस्ते अनुदानातून रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती. त्या कामांचे कार्यादेश देण्याची कार्यवाही सुरू असतानाच ही आचारसंहिता लागू झाल्याने विकासकामांना फटका बसला आहे. पावसाळ्यानंतर कामे धीम्या गतीनेआधीच शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. मनपाने मोठा गाजावाजा करून चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या क्षेत्रात प्रत्येकी 30 रूपये  तर प्रमुख रस्त्यांसाठी 80 लाख रूपयांची तरतूद करून निविदा काढून कामे सोपविण्यात आली. मात्र तरीही ठराविक रस्ते वगळता अनेक रस्त्यांवर खड्डे जैसे-थे असल्याचे दिसून येत आहे. मक्तेदार काम करत नसेल तर मनपा बांधकाम विभागाने ते काम करायला हवे होते. मात्र पावसाळा संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरीही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यात ही रस्त्यांची कामेही रखडल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. 34 हजार मतदार बजावणार हक्कजळगाव :  पदवीधर मतदार संघासाठी  3 फेब्रुवारी रोजी होणा:या या मतदानासाठी जिल्ह्यातील 34 हजार 442 पदवीधर आपला हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 41 केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, माहिती अधिकारी मिलिंद दुसाने उपस्थित होते. पदवीधर मतदारांची यादी 7 जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीनुसार जिल्ह्यात 34 हजार 442 मतदार आहेत. त्यासाठी 41 संभाव्य मतदान केंद्र राहणार आहेत. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणे व मतमोजणी ही कामे नाशिक येथेच होणार आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी बँक, आयकर विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली.  पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखत आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले.