तालुक्यातील बोरी,पांझरा व तापी नदीवरून अवैध गौण खनिज वाहतूक करताना महसूल पथक तसेच पोलिसांनी पकडलेल्या वाहनांना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी नोटिसीद्वारे दंड भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र मुदतीत दंड न भरल्याने सदरची वाहने पोलीस स्टेशनला अडकवून ठेवण्यात आली होती. दंडात्मक रक्कम शासनाकडे भरण्यासाठी ती वसूल करण्यासाठी या वाहनांचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाच टेम्पो, एक ट्रक, एक ट्रॅक्टर तर मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत चार ट्रॅक्टर, एक टेम्पो, एक ट्रक अशी एकूण १३ वाहने लिलावात काढली असून १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरून बोली बोलावी, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
दंड न भरल्याने १३ वाहनांचा होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST