शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्यांसाठी १२५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 11:29 IST

दिल्लीतील बैठकीत निर्णय

ठळक मुद्दे तीन चौकात होणार भुयारी मार्ग देखभाल दुरूस्तीची जबाबदारी मनपाकडेचजागा हस्तांतरणासाठी मनपाचा लागणार ठराव

जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बुधवार, ७ रोजी दुपारी बैठक झाली. त्यात समांतर रस्त्यासह शहरातील महामार्ग काँक्रीटीकरण व त्यावर तीन चौकात क्रॉसिंगसाठी भुयारी मार्ग (बोगदे) आदी कामांसाठी आधी मंजूर १०० कोटीत आणखी २५ कोटीची भर घालत १२५ कोटींचा निधी देण्यास मंजुरी देण्यात आली.मात्र यासाठी जागेच्या मालकीचा तिढा सोडविणे आवश्यक असल्याने मनपाने महासभेत ही जागा रस्त्याच्या कामासाठी ‘नही’कडे वर्ग करून रस्त्याचे काम झाल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी मनपा रस्ता ताब्यात घेईल, असा ठराव करून द्यावा लागणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’ला दिली.आमदार खडसे व आमदार सुरेश भोळे यांनी गडकरी यांची भेट घेऊन या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केल्याने ही बैठक आयोजित केली होती. त्यास खासदार ए.टी. पाटील, खासदार रक्षा खडसे , जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर तसेच ‘नही’चे अधिकारी उपस्थित होते.शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांसाठी व महामार्ग दुरुस्तीसाठी १०० कोटीचा निधी हा समांतर रस्त्यांची जागा ‘नही’च्याच ताब्यात असल्याचे गृहित धरून मंजूर झाला होता. मात्र ती जागा मनपाच्या ताब्यात असल्याचे नंतर निदर्शनास आल्याने तांत्रीक अडचण निर्माण झाली. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे या विषयी तोडगा काढण्यासाठी आमदार खडसे यांच्या आग्रहावरून ही बैठक झाली. बैठकीत जागेच्या मुद्यावर चर्चा झाली. जागेची मालकी मनपाकडे असल्याने ‘नही’ त्यावर पैसे खर्च करू शकत नसल्याने ही तांत्रीक अडचण दूर करण्यासाठी काम करेपर्यंत मनपाने हा रस्ता महासभेत ठराव करून ‘नही’कडे वर्ग करावा. काम झाल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा ताब्यात घ्यावा, असा तोडगा सुचविण्यात आला.तांत्रीक अडचणीवर मनपाच्या ठरावाचा तोडगासमांतर रस्त्यांची जागा मनपाने उच्च न्यायालयात समांतर रस्ते करण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर ‘नही’ने मनपाकडे हस्तांतरीत केली होती. ती जागा मनपाने महासभेचा ठराव करून समांतर रस्त्यांचे काम तसेच शहरातील महामार्ग काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी ‘नही’कडे वर्ग करण्याचा ठराव तातडीने करून देण्याचा तोडगा सुचविण्यात आला आहे. ‘नही’ने समांतर रस्त्यांचे काम केल्यानंतर ते रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा मनपाला ताब्यात घ्यावे लागणार आहेत.जळगाव-औरंगाबाद महामार्गाचेही चौपदरीकरणजळगाव ते औरंगाबाद महामार्गाचेही दुपदरीकरणाचे काम मंजूर असून ते सुरू देखील आहे. मात्र हा सर्वच रस्ता चौपदरी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.१२५ कोटीतून ही होणारी कामे1 काँक्रीटीकरण : कालिंका माता मंदिर ते खोटेनगरपर्यंतच्या सुमारे ७.३० किमी लांबीचा सध्याचा राष्टÑीय महामार्ग क्र.६ चे काँक्रीटीकरण करण्यात येईल.2 कालिंका माता मंदिर ते खोटेनगरपर्यंत समांतर रस्ते : कालिंका माता मंदिर ते खोटेनगर पर्यंतच्या अंतरात महामार्गाच्या दोन्ही बाजूचे समांतर रस्ते करून त्याचे डांबरीकरण करण्यात येईल.3 तीन ठिकाणी बोगदे : या महामार्गावर रस्ता क्रॉसिंगसाठी गुजराल पेट्रोलपंप चौक, अग्रवाल हॉस्पिटल चौक व शिवकॉलनी चौक या तीन चौकात बोगदे तयार करण्यात येतील.4 फुटपाथ व गटार : या महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्त्यांच्या लगत फूटपाथ व गटार बांधण्यात येईल.5 मुख्य रस्ता व समांतर रस्त्यात दुभाजक : शहरातून जाणारा महामार्ग व त्याचे समांतर रस्ते यात दोन मीटरचे दुभाजक राहतील. तसेच त्यात पथदिवे असतील.