शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१११ मीटर तिरंगा रॅलीने जागविली देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना पदक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रविवारी हॉकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना पदक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रविवारी हॉकी जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल १११ मीटर लांब तिरंगा रॅली काढण्यात आली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंनी रॅलीत सहभाग नोंदविला होता. भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी शहर दुमदुमले होते.

सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. त्याआधी ध्वजास मानवंदना देण्यात आली. नंतर १११ मीटर लांबीचे व ३० मीटर रुंदीचा भारतीय तिरंगा हॉकी, फुटबॉल खेळाडूंनी तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या खांद्यावर घेऊन रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, शास्त्री टॉवरमार्गे चित्रा टॉकीज व नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत हॉकी प्रशिक्षक अरविंद खांडेकर, खो-खो प्रशिक्षक मीनल थोरात, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक व तालुका क्रीडा अधिकारी नॉर्थ दमाई, कर्मचारी विनोद कुलकर्णी व विनोद माने यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मनियार व सिकलगर बिरादरीतर्फे मार्गात तिरंगा रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅली काँग्रेस भवनजवळ आल्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जमील शेख आदींची उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमात अनुभूती स्कूलचे क्रीडा शिक्षक संजय पाटील, प्रवीण ठाकरे यांनी खेळाचे महत्त्व सांगितले. हॉकी प्रशिक्षक सय्यद लियाकत अली यांनी सूत्रसंचालन केले व आभार सत्तू पवार यांनी मानले. प्रास्ताविक मुजफ्फर शेख यांनी केले.

रॅलीत यांचा होता सहभाग

या रॅलीमध्ये फारूख शेख, अनिता कोल्हे, दीपक आरडे, विवेक अळवणी, राष्ट्रीय खेळाडू सुनयना राजपाल, हर्षाली पाटील व गार्गी ठाकरे, अरविंद खांडेकर, मीनल थोरात, विनोद माने तर मुजाहीद काझी, ऋग्वेद चौधरी, कृष्णा राठोड, देव पांडे, धीरज जाधव, शुभम सोनवणे, पूर्वेश महाजन, पंकज बारी आदींची उपस्थिती होती.