शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

१० मार्चपर्यंत साईटपट्टया व महामार्गावरील खड्डे बुजवा

By admin | Updated: February 26, 2017 00:36 IST

पालकमंत्र्यांचे आदेश : कृती समिती सोबत चर्चा; आता नितीन गडकरींकडे होणार बैठक

जळगाव : चौपदरीकरणाचे काम, त्यासाठी शहराबाहेरून जाणारा बायपासच्या कामाला वेळ असल्याने या कामांपूर्वी शहरातील समांतर रस्त्यांची कामे सुरू करण्याचे आदेश राष्टÑीय रस्ते विकास प्राधिकरणाला दिले जावेत अशी मागणी समांतर रस्त्यांसाठी स्थापन कृती समितीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शनिवारी केली. याप्रश्नी आता लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठकीचा निर्णय यावेळी झाला. समांतर रस्त्यांच्या कामांसाठी पाठपुरावा करणाºया कृती समितीच्या सदस्यांशी शनिवारी रात्री १० वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. १० मार्चपर्यंत साईटपट्टया व महामार्गावरील खड्डे बुजविले जावेत असे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी समितीच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन व विविध कागदपत्रे सुपूर्द केली. निवेदनात म्हटले आहे की,  महामार्गाच्या पलिकडे अनेक शैक्षणिक संस्था तसेच अर्धे शहर आहे. लाखो लोक रोज शहराकडे येतात व जातात. त्यांना महामार्ग ओलांडूनच जावे लागत असते. त्यामुळे महामार्गावर अपघात नित्त्याचेच झाले आहेत. चार वर्षात हजारावर लोकांचे यामुळे बळी गेले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गेल्या वर्षी झालेल्या दौºयात जिल्ह्यासाठी १६ हजार ५८२ कोटींच्या निधीची कामे मंजूर झाली. त्यात शहरातील मार्गांचाही समावेश होता मात्र अद्याप त्यातील बरीच कामे झालेली नाहीत. चौपदरीकरणाच्या बायपासच्या कामाला अद्याप बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे अगोदर समांतर रस्त्याच्या कामाला सुरूवात करावी अशी मागणी शिष्टमंडळाने चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.  पुढील महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत आपण स्वत:, कृती समितीचे पदाधिकारी व राष्टÑीय रस्ते विकास प्राधिकरणाचे अधिकारी अशी संयुक्त बैठक घेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. बैठकीस कृती समितीचे डॉ. राधेश्याम चौधरी, अनंत जोशी, विनोद देशमुख, गजानन मालपूरे, विराज कावडिया, अमित जगताप, प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंंद काळे, अरविंद गंडी व अन्य अधिकारीही उपस्थित होते. त्वरित डीपीआर सादर कराकृती समितीच्या सदस्यांशी चर्चा करताना पालकमंत्र्यांनी मागणीनुसार शहरातून जाणाºया महामार्गाच्या ४५० कोटींच्या डीपीआर त्वरित सादर करावा या मागणीनुसार मार्चमध्ये हा डीपीआर राष्टÑीय रस्ते विकास प्राधिकरणाला सादर करावा असे आदेश अधिकाºयांना दिले. तसेच १० मार्चपर्यंत साईटपट्टया व महामार्गावरील खड्डे बुजविले जावेत अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.