शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

जिल्ह्यातील १०० ग्राम पंचायतींसाठी २६ डिसेंबरला होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 16:15 IST

निवडणूक: ५ डिसेंबरपासून दाखल होणार उमेदवारी अर्ज

ठळक मुद्देराजकीय वर्चस्वासाठी धडपडजळगाव तालुक्यातील ११ ग्रा.पं.चा समावेश२७ डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

जळगाव: जिल्ह्यातील १०० ग्रा.पं.च्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असून २७ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी राजकीय हालचालींना गती आली आहे. जळगाव तालुक्यातील ११ ग्रा.पं.चा त्यात समावेश आहे.जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाºया आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी  १२ डिसेंबर २०१७ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत  १४  डिसेंबर  असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.  २६  डिसेंबर रोजी सकाळी ७.३०  ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.राजकीय वर्चस्वासाठी धडपडदोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात नसतानाही ग्रा.पं.वर आपले पॅनल निवडून आल्याचा दावा करण्याची चढाओढच राजकीय पक्षांमध्ये लागली होती. या निवडणुकीतही त्याचाच प्रत्यय येणार आहे.निवडणुक जाहीर झालेली तालुकानिहाय गावे पुढील प्रमाणे-जळगाव (११) : पळसोद, धामणगाव, निमगाव बु., खेडी खु., डोमगाव, पाथरी, लोणवाडी बु.।।, विटनेर, बिलवाडी, सुभाषवाडी, जामोद.धरणगाव (१३): वाकटुकी, अंजन विहिरे, खामखेडे, तरडे, सतखेडा, झुरखेडा, निमखेडा, बोरखेडा, भोद बु.।।, वराड खु.।।, बाभुळगाव, फुलपाट, टहाकळी खु.।।.जामनेर(३): टाकळी बु.।।, नांद्रा हवेली, सवतखेडे.एरंडोल(१): सावदा प्र.चा.भुसावळ(३): अंजनसोंडे, फुलगाव, वेल्हाळे.यावल(७): गाड्र्या, किनगाव खु.।।, गिरडगाव, बोराळे, साकळी, म्हैसवाडी, बोरखेडे खु.।।,मुक्ताईनगर (४): मुक्ताईनगर, चिखली, बेलसवाडी, पिंप्रीनांदू.रावेर (११):आभोडे, चिनावल, कळमोदे, मांगी, पातोंडी, रोझोदे, शिंगाडी, थेरोळे, उटखेडे, वाघोदे खु.।।, खिर्डी बु.।।पाचोरा(४): गाळण खु.।।, विष्णुनगर, वडगाव आंबे बु.।।, वडगाव आंबे.चाळीसगाव (८): दहिवद, चिंचगव्हाण, वडाळे-वडाळी, पातोंडा, ओझर, माळशेवगे, पिंप्री बु.प्र.चा., तळेगाव.भडगाव (५): लोण प्र.ऊ., पासर्डी, भातखंडे बु.।।, अंजनविहिरे, गुढे.अमळनेर (६): शिरसाळे बु.।।, पिंपळे खु.।।, सडावण बु., रढावण, नंदगाव, मठगव्हाण.पारोळा(११): खेडी ढोक, वाघरे, पोपटनगर, भोंडणदिगर, उंडणीदिगर, खोलसर, चहुत्रे, शेवगे प्र.ब., मोंढाळे प्र.ऊ., दगडी सबगव्हाण, मोहाडी.चोपडा(१३): लासुर, गणपूर, विष्णापूर, वडती, वराड, आडगाव, मालखेडे, अनवर्दे खु., तावसे, पारगाव, सुटकार, वडगांव बु.।।, धुपे बु.।।