शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक, प्राचार्यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

- डमी : स्टार - ८१९ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शहरातील शाळांमधील नव्या ...

- डमी : स्टार - ८१९

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शहरातील शाळांमधील नव्या शैक्षणिक वर्गाचा श्रीगणेशा ऑनलाईन झाला. दरवर्षीप्रमाणेच १५ जून रोजी शाळा भरल्या, पण त्या शाळेत नव्हे तर घराघरात. दुसरीकडे मात्र मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळांमध्ये हजेरी लावावी लागत आहे. नुकतेच शिक्षण विभागाने परिपत्रक काढले असून त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात प्रत्यक्ष शाळा भरविणे शक्य नसल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत पालकांना आगाऊ सूचना देण्यात आल्या होत्या. पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालकांनीही लॅपटॉप, डेस्कटॉप अथवा मोबाइल, हेडफोन, प्रिंटर आदी जमा करून ठेवले होते. शाळेच्या नेहमीच्या वेळी विद्यार्थी शाळेच्या गणवेशात लॅपटॉपसमोर बसले आणि हजेरीची नोंद होऊन नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला. शाळेची वेळ होण्यापूर्वी नेट कनेक्शनची तपासणी, लॅपटॉपचे चार्जिंग, स्पीकर-हेडफोन, वही, पुस्तक, पेन आदी तयारी करण्यात आली होती. काही अ‍ॅप्लिकेशनवर अन्य विद्यार्थ्यांचे चेहरेही दिसत असल्याने अनेकांनी सुटीनंतर पहिल्यांदाच आपल्या मित्र-मैत्रिणींना हाय-हॅलो केले. काही तांत्रिक अडचणी वगळता विद्यार्थी आणि शिक्षकांनीही शिक्षणाच्या या नव्या स्वरूपाचा आनंद घेतला आणि ऑनलाईन शाळा भरल्या.

शंभर टक्के उपस्थितीत यांचा समावेश

इयत्ता दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत तो निकाल घोषित करावयाचा आहे. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. सोबत शिक्षकेतर कर्मचारी यांचीसुध्दा शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली गेली आहे.

शिक्षकांमध्ये उडाला गोंधळ

इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली आहे. मध्यंतरी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत दोन पत्रके काढण्यात आली होती. परिणामी, यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला होता. जिल्हा परिषदेने शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती तर शिक्षण संचालकांच्या पत्रकात ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे म्हटले होते. मात्र, आता संचालकांच्या पत्राच्या आधारावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उपस्थितीबाबत परिपत्रक काढले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ऑनलाईन वर्ग भरले. कुठल्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना नियमित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अभ्यास पाठविण्यात येत असून तो करून घेतला जात आहे.

- मनोज भालेराव, शिक्षक

अशा आहेत शाळा

जिल्हा परिषद : १८२८

शासकीय शाळा : ३१

मनपा शाळा : ३०

नगरपालिका शाळा : ४३

खासगी अनुदानित शाळा : ९६२

खासगी विनाअनुदानित शाळा : १५६

स्वयंअर्थसहायित शाळा : ३३९

मान्यता नसलेल्या शाळा : १०