शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीसाठी गेलेले ११ कुटुंबातील ६१ सदस्य सुरतमध्ये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:40 IST

मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे राकेश जाधव यांची तक्रार

चाळीसगाव : सुरत येथील होजीवाला एमआयडीसी येथे मजुरीसाठी गेलेली चाळीसगाव तालुक्यातील विविध तांड्यातील ११ कुटुंबातील ६१ सदस्य सुरत येथेच अडकली आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस त्यांना सुरत सोडून जाऊ देण्यास मज्जाव करीत असल्याची तक्रार असून या सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचे तक्रारीत नमुद आहे. या कुटुंबियांचा सहानुभूतीने विचार करून त्यांची उपासमार टाळावी व त्यांना मदत करण्याची मागणी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी असलेल्या कारखाना मालकांनी कारखाने बंद केल्याने त्यांची मजुरी गेली आहे. कारखाने मालकांनी त्यांना गावी जाण्याचे सांगितले आहे. मात्र त्यांना पैसा व साधनांच्या अभावापायी आपल्या गावी जाणे शक्य होत नाही. सर्वत्र संचारबंदी आहे. शिवाय त्यांच्याजवळ पैसा ही नाही. अशा परिस्थितीत या कुटुंबाची मोठी कोंडी झाली आहे.हे लोक सध्या सूरतमध्येच आहेत. संचारबंदी असल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.या मजुरांना गावी येण्यासाठी सुविधा व रेशनची व्यवस्था त्वरित करून द्यावी व त्यांची होणारी उपासमार टाळावी. त्यासाठी संबंधितांना योग्य सूचना कराव्यात अशी मागणी राकेश जाधव प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव