शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात 1 लाख 61 हजार रुग्णांचे मुख स्वास्थ अस्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 11:48 IST

शनिवारी मोहिमेचा समारोप

ठळक मुद्देमुख स्वास्थ तपासणीत आढळला कर्करोग रुग्णजिल्हा रुग्णालयात मोफत तसापणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29-   शासनाच्या राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या मुख स्वास्थ तपासणी मोहिमेंतर्गत 27 डिसेंबर्पयत जिल्हाभरात 8 लाख 71 हजार 632 जणांची तपासणी करण्यात आली असून यातील 1 लाख 61 हजार रुग्णांचे मुख्य स्वास्थ अस्वच्छ आहे.  यामध्ये एका जणाला कर्करोग असल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेचा 30 डिसेंबर रोजी समारोप होत आहे. या संदर्भात गुरुवारी जिल्हा रुग्णालयात पत्रपरिषद होऊन या विषयी माहिती देण्यात आली. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, दंत शल्य चिकित्सक डॉ. संपदा गोस्वामी,  जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार  डॉ. नितीन भारती, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी आदी उपस्थित होते. या तपासणी मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयांमधील  30 वर्षे वयावरील नागरिकांच्या मौखिक तपासणी शिबिराचे 1  डिसेंबरपासून आयोजन  करण्यात आले होते.  एका जणाला आढळला कर्करोगजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आलेल्यांपैकी एका जणाला जीभेचा कर्करोग असल्याचे या मोहिमेतून समोर आले आहे. अशाच प्रकारे जिल्हा रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षात नेहमी नागरिकांची तपासणी केली जाणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले. 1774 जण जिल्हा रुग्णालयातजिल्ह्यात मुख स्वास्थाची तपासणी केलेल्या 8 लाख 71 हजार 632 जणांपैकी तब्बल एक लाख 61 हजार 191 जणांचे मुख स्वास्थ अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे. तपासणीतील 64 हजार 842 जणांना दारुचे, एक लाख 32 हजार 186 जणांना तंबाखू, सुपारीचे व्यसन असल्याचे दिसून आले. सात लाख 9 हजार 539 जणांचे मुख स्वास्थ स्वच्छ असून 8 हजार 513 जणांना व्यसनामुळे तोंड उघडता येत नसल्याचेही समोर आले आहे. 4191 जणांच्या मुखात पांढरे, लाल चट्टे असून 1494 जणांची जीभ जाडसर झाली आहे. यात 403 जणांमध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त दिवसानंतरही बरा न होणारा व्रण आढळून आला. यामध्ये कर्करोगाच्या निदानासाठी तपासणी आवश्यक असलेल्या 1774 जणांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आल्याचे डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.जिल्हा रुग्णालयात मोफत तसापणीया मोहिमेंतर्गत जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आलेल्यांची तसेच नव्याने येणा:यांची जिल्हा रुग्णालयात कर्करोग तज्ज्ञ डॉ.नीलेश चांडक हे मोफत तपासणी करीत असून याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.चव्हाण यांनी केले. या मोहिमेचा 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात समारोप होणार आहे. या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार  आहे.